महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (समित्यांची नेमणूक) नियम 1963 नुसार स्थायी व विषय समिती यांची नेमणूक करण्यांत येईल.
स्थायी समितीची रचना :-
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (1) कलम 81 च्या तरतुदींचे अधीनतेने जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेले आठ सदस्य यांची मिळून स्थायी समिती सभेची रचना असते. जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती असतात. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिध्द् सदस्यसचिव असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (1)(ग) चे तरतुदीनुसार स्थायी समितीवर जिल्हा परिषद सदस्यांमधून आठ (8) सभासदांची निवड करणे. पैकी 2 सदस्य अनुसचित जाती, अनुसुचित जमाती किंवा नागरीकांचा मागास प्रवर्गातील असतील.