सांसद आदर्श ग्राम योजना (SAGY)

विभाग : ग्रामपंचायत विभाग
प्रस्तावना

योजनेची कार्यपध्दती-

  • ग्रामपंचायतीची निवड-

    सांसद आदर्श ग्राम योजनेत ग्रामपंचायत हा मूळ घटक आहे. सपाट ,मैदानी भागात एका पंचायतीची लोकसंख्या 3000 ते 5000, पर्वतीचे, जनजातीय, दुर्गम क्षेत्रात 1000 ते 3000 राहू शकेल. जिथे या घटकाचा आकार निश्चित नसेल तेथे अशा ग्रामपंचायतीची निवड होऊ शकेल. ढोबळ मानाने अपेक्षित प्रमाणांची लोकसंख्या असेल.

    संबंधीत खासदारांस त्यांना योग्य वाटलेली ग्रामपंचायत निवडण्याचे स्वातंत्र राहिल. पण त्यांनी स्वत:चे वा आपल्या पतीचे/पत्नीचे गाव निवडू नये.

    सांसद एक ग्रामपंचायत तत्काळ विकासासाठी निवडतील व आणखी दोन ग्रामपंचायत काही आवधीनंतर निवडून ठेवतील. लोकसभेचे सांसद आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडतील. लोकसभेचे सांसद आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायत निवडतील तर राज्यसभेचे सांसद त्यांनी निवड ज्या राज्यातून झाली असेल त्या राज्यातील आपल्या मर्जीप्रमाणे कुण्याही जिल्हयाच्या ग्रामिण भागातील ग्रामपंचायतीची निवड करु शकतील. शहरी मतदारसंघाच्या बाबतीत (जिथे ग्रामपंचायत नसतात) संबंधीत सांसद जवळच्या एखादया ग्रामिण मतदार संघातील ग्रामपंचायतीची निवड करतील. या योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यत तीन ग्राम विकसीत करण्याचे आहे. त्यापैकी एक 2016 पर्यत ग्रामपंचायत विकसित करावयाची आहे. त्यानंतर अशा पाच आदर्श गावाची निवड करण्यात येईल. (दरवर्षी एक याप्रमाणे) आणि 2024 पर्यत त्यांचा विकास करणेत येईल.

अधिक माहितीसाठी शासनाचा दिनांक GR खालील लिंकवर पहावा.

"..\..\..\GR and Circural All Department\Villege Panchayat\सांसद आदर्श ग्राम योजना-अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना.pdf

  • योजनेचे उद्देश

    योजनेचे प्रमुख उददेश :-

    • निवडलेल्या ग्रामपंचायतीचा सर्वागीण विकास साधणा-या प्रक्रियांचा वेग वाढविणे.
    • सर्व स्तरातील जनतेच्या जीवनमानात आणि राहणीमानात शाश्वत उपायांनी वास्तविक सुधारणा घडवून आणणे.(1. प्रगत मुलभूत सुधारणा,2. उत्कृष्ठ उत्पादकता, 3. वाढीव मानव विकास, 4. उपजीवीकेच्या चांगल्या संधी, 5. सामाजिक विषमतेत कमी आणणे, 6. अधिकार आणी हक्कांची सुगम प्राप्ती 7. सामाजीक एकोप्यात वाढ 8. समृध्द सामाजिक भांडवल)
    • स्थानिक पातळीवरील विकासांच्या आणि परिणामकारी स्थानीक शासनाचे आदर्श निर्मित करणे ज्यामुळे आसपासच्या ग्राम पंचायतींना शिकण्याची आणि या आदर्शाना स्वीकारण्याची प्रेरणा मिळू शकेल.
    • निवडलेल्या आदर्श गावांना स्थानिक विकासाच्या विदयालयाप्रमाणे वाढवणे जेणे करुन इतर ग्रामपंचायतीना प्रशिक्षित करता यावे.
  • योजनेचे स्वरूप

    सांसद आदर्श ग्राम योजनेचा उददेश सर्वागीण विकास साधणे हा आहे. स्थानिक विकास आणि परिणामकारक स्थानिक शासन पध्दती असलेल्या आदर्श ग्रामपंचायती घडविणे जेणेकरुन आसपासच्या ग्रामपंचायतीना शिकण्याची व या आदर्शाना स्विकारण्याची प्रेरणा मिळू शकेल हे या योजनेचे मुख्य धेय्य आहे. सर्व लोकांचा सहभाग, स्त्री-पुरुष समानता, महिलांना सन्माननीय वागणूक , अंत्योदय, आर्थिक व समाजिक न्याय,श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, सार्वजनिक जीवनात पारदर्शिता, उत्तरदायित्व, स्थानिक स्वशासन व सुशासन, नैतिक मुल्यांचे पालन, स्थानिक सांस्कृतीक वारश्याचे जतन या मुल्यांवर आधारीत निवडलेल्या ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे.

  • लाभार्थी पात्रता
  • यशोगाथा
  • छायाचित्र दालन

सूचना फलक