योजनेचे नांव - प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
घरकुल बांधकामासाठी रक्कम - रु.1,20,000/-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) ) अंतर्गत 90 मनुष्यदिन निर्मीतीचे मजूरीच्या स्वरुपात रक्कम रु. 18,270/-
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता प्रोत्साहनपर अनुदान रु.12,000/-
घराचे क्षेत्रफळ 269 चौ. फुट चटई क्षेत्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने) अंतर्गत 90 मनुष्यदिन निर्मीतीचे मजूरीच्या स्वरुपात मिळणारे र.रु.18,270/- साठी प्रथम खालील गोष्टी प्राधान्याने करणे.
1. घरकुल बांधकाम मजूर यादी तयार करणे व आवशकतेनूसार मजूर नेांदणी करणे
2. कुटूंब ओळखपत्र क्रमांक (JOB CARD NO.) घेणे
3. शक्यतो मजूरांचे जवळच्या राष्टीयकृत बँकेत बचत खाते उघडणे./जिल्हा मध्यवर्ती बँकेत बचत खाते उघडणे.
4. मजूरांचे आधार क्रमांक घेणे
5. आधार कार्ड,बचत खाते पासबुक व कुटूंब ओळखपत्र यांच्या झेरॉक्स प्रती घेणे.
प्रथम टप्पा :-
प्रथम टप्यात करावयाची कार्यवाही.
1. घरकुल बांधकाम करावयाचे जागेची साफसफाई करणे
2. ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांचे कडून जागेची आखणी (लाईन आऊट) करून घेणे.
3. पाया बांधकामासाठी लागणारे साहित्याची जमवा-जमव करणे.
4. घरकुल बांधकामासाठी गवंडयाची निवड करणे.
5. प्रत्यक्ष पाया खोदकाम करून पायाचे बांधकाम करणे.
6. प्रत्यक्ष पाया खोदकाम व पायाचे बांधकाम या करिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत 28 मनुष्यदिन निर्मीतीचे मजूरीच्या स्वरुपात मिळणारे र. रु. 5684 मजूरांचे बचत खात्यामध्ये जमा होतील.
7. पाया बांधकाम पुर्ण होताच ग्रामीण गृह निर्माण अभियंता/ग्राम विकास अधिकारी /ग्रामसेवक यांना कळविणे.
8. ग्रामीण गृह निर्माण अभियंता/ग्राम विकास अधिकारी /ग्रामसेवक यांनी पाया बांधकामाचा फोटो तात्काळ आवास सॉफ्टमध्ये अपलोड करणे.
व्दितीय टप्पा :-
व्दितीय टप्प्यात करावयाची कार्यवाही.
विट बांधकामासाठी लागणारे साहित्य- (For Standard House)
विट - 12,500 वीटा
वाळू/रेती – 4 ब्रास
सिमेंट - 75 बॅग
चौकट – आवश्यकतेनूसार
खिडक्या - आवश्यकतेनूसार इत्यादी साहित्यांची जमवा-जमव करणे
1. विट बांधकामास सुरूवात करणेपुर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत 24 मनुष्यदिन निर्मीतीचे हजेरी पत्रक ग्राम विकास अधिकारी /ग्रामसेवक यांनी नरेगा कक्षातून काढून घेणे.
2. विट बांधकामास सुरूवात करणे.
3. सोबतच शौचालय बांधकामास सुरूवात करणे.
4. विट बांधकाम लिंटेल लेव्हलपर्यंत पूर्ण करणे.
5. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता/ग्राम विकास अधिकारी/ग्रामसेवक यांना विट बांधकाम पूर्ण झालेबाबत कळविणे.
6. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी फोटो आवास सॉफ्टमध्ये तात्काळ अपलोड करणे.
तृतीय टप्पा :-
तृतीय टप्यात करावयाची कार्यवाही.
वासे –
रिपा –
पत्रे/कौले इत्यादी साहित्य गोळा करणे.
1. छतकाम करणेपुर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत 10 मनुष्यदिन निर्मीतीचे हजेरी पत्रक ग्राम विकास अधिकारी /ग्रामसेवक यांनी नरेगा कक्षातून काढून घेणे.
2. छतकाम पूर्ण करुन घेणे.
3. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता/ग्राम विकास अधिकारी/ग्रामसेवक यांना छतकाम पूर्ण झालेबाबत कळविणे.
4. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी फोटो आवास सॉफ्टमध्ये तात्काळ अपलोड करणे.
चौथा टप्पा :-
चौथ्या टप्यात करावयाची कार्यवाही.
1. घरकुल परिपूर्ण करणेपुर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत 28 मनुष्यदिन निर्मीतीचे हजेरी पत्रक ग्राम विकास अधिकारी /ग्रामसेवक यांनी नरेगा कक्षातून काढून घेणे.
2. घरकुलाला प्लॉस्टरिंग करणे.
3. घरकुल बांधकाम शौचालयासहीत पूर्ण करणे.
4. दरवाजे, खिडक्या यांच्या झडपा कडी-कोयंडयासह बसविणे.
5. घरकुलाला रंगकाम करणे व घरकुलाच्या दर्शनीय भिंतीवर नामफलक विहित नमुन्यात नोंदविणे.
6. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता/ग्राम विकास अधिकारी/ग्रामसेवक यांना घरकुल बांधकाम परिपूर्ण झालेबाबत कळविणे.
7. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी फोटो आवास सॉफ्टमध्ये तात्काळ अपलोड करणे.
घरकुल अनुदान वाटपाचे टप्पे :-
अ.क्र.
|
घरकुल स्थिती
|
हप्ता क्रमांक
|
द्यावयाची रक्कम
|
1
|
घरकुल मंजूरी
|
पहिला
|
15,000/-
|
2
|
जोते काम पूर्ण
|
दुसरा
|
45,000/-
|
3
|
लिंटेल काम पूर्ण
|
तिसरा
|
40,000/-
|
4
|
शौचालयासह घरकुल पूर्ण
|
चौथा
|
20,000/-
|
एकूण
|
1,20,000/-
|
लाभाचे स्वरुप :-
घरकुलाच्या बांधकामासाठी दि. 06 नोव्हेंबर, 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे घरकुलास खालील प्रमाणे अनुदान देय आहे.
अ.
क्र.
|
बाब
|
सन 2017-18 अनुदान रक्कम रुपये
|
1)
|
केंद्र शासनाकडील अनुदान
|
72,000
|
2)
|
राज्य शासनाकडील अनुदान
|
48,000
|
एकूण
|
1,20,000
|
घरकुलाचे बांधकाम व तंत्रज्ञान
घरकुलाचे बांधकाम पक्क्या स्वरुपाचे असावे. त्याचप्रमाणे घरकुलाचे जोत्याचे क्षेत्रफळ किमान 269 चौ. फुट (25 चौ.मी.) असावे. घरकुलात न्हाणीघर, सुधारित चुल, विद्युतीकरण आणि परिसर सुधारणा अनिवार्य आहे.
ठाणे जिल्ह्यातील हवामान विषयक परिस्थिती पाहता तसेच गरज, सामाजिक परंपरा, पसंती, सांस्कृतिक दृष्टीकोन आणि शासनाकडील अनुज्ञेय अनुदान विचारात घेता संकल्प चित्राप्रमाणे स्थानिक साहित्याचा वापर करुन नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन थिमॅटीक मॉडेल संकल्पना राबवून घरकुल बांधावयाचे आहे. त्यासाठी खालील बाबी विचारात घ्याव्यात.
-
घरकुलांना बाहेरील भागास गुलाबी रंग देण्यात यावा. तसेच दरवाजे-खिडक्यांच्या चौकटी पिलर इत्यादी ठिकाणी विशिष्ट रंगसंगतीसह वारली पेंटींग करण्यात यावे.
-
घरकुलांचे समोरील (Front Outer Wall) भिंतीवर बाहेरील बाजूस दरवाजाचे उजव्या बाजूस 2 फूट x 1.5 फूट आकाराचा आयताकृती नामफलक तयार करावा. त्यावर गडद लाल रंगाच्या बॉर्डरसह योजनेचे नांव, मंजूरीचे वर्ष, लाभार्थ्यांचे नांव, मिळालेले अनुदान PMAY-G लोगो असा तपशिल लिहावा.
-
घरकुलाचे परिसरात शक्य तेथे परसबाग ही संकल्पना राबविणेत यावी.
-
शक्य त्या ठिकाणी गांडुळखत प्रकल्प राबविणेत यावा.
-
घरकुलाचे आजूबाजूस लाकडाचे/बांबु काटीचे कंपाऊंड करुन त्यालगत फुलांच्या/फळ भाज्यांच्या वेलीची लागवड करण्यात यावी.
-
ज्या ठिकाणी शक्य असेल अशा ठिकाणी समुह स्वरुपात घरकुल बांधकामे करण्यात यावी. जेणेकरुन अशा ठिकाणी एकत्रित व्हरांडा,चौक, बगीचा,पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रित स्टँडपोस्ट,अशा सुविधा देणे सोईचे होईल.
-
स्वयंपाक घरातील भिंतीमध्ये कडप्पाची मांडणी करण्यात यावी.
-
मंजूर घरकुलांना MREGS Convergence चा लाभ देण्यात यावा.
-
समाजकल्याण विभागाकडील निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन प्रस्तावित करावे.
राज्य पुरस्कृत योजना :-) शबरी आदिवासी घरकुल योजना )
योजनेचा उद्देश :-
अनुसूचित जमातीतील गरीब – गरजू, बेघर व कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी सहाय्य व अनुदान देणे.
निवडीचे निकष :-
1) अनुसूचित जमाती संवर्गाचा असावा.
2) लाभार्थ्यांकडे अनुसूचित जातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
3) महाराष्ट्र राज्यात वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.
4) लाभार्थीकडे घरकुल बांधकामासाठी स्वत:ची अथवा शासनाची जमीन असणे आवश्यक आहे.
5) लाभार्थीकडे स्वत:चे अथवा कुटुंबाचे पक्क्या स्वरुपाचे घर नसावे.
6) विधवा, परितक्त्या, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थींना प्राधान्य.
7) ग्रामीण क्षेत्रासाठी उत्पन्नाची मर्यादा रक्कम रु.1.20 लाख पर्यंत असावे.
8) लाभार्थीने इतरत्र योजनांमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.
2) 2) आदिम जमातीच्या कुटुंबासाठी घरकुल योजना :-
योजनेचा उद्देश :-
आदिम जमातीचा समाज गाव, वाड्या, पाडे, वस्त्यांवर राहतात. आदिम जमातीच्या या स्थलांतर करणारा समाज असून त्यांना स्वत:ची घरेही नाहीत. तर काहींची कुडा, मातीची घरे आहेत. अशा आदिम जमातीच्या कुटुंबांना पक्के घरकुल देऊन त्यांना शौचालय व स्नानगृहाची व विद्युत सुविधा उपलब्ध करुन त्यांना शाश्वत स्वरुपाचा निवारा उपलब्ध करुन देणे, स्थलांतरीला आळा घालून त्यांचे राहणीमानात सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
निवडीचे निकष :-
1) लाभार्थी हा कातकरी, कोलम, माडीया गोंड या आदिम जमातीचा असावा.
(2 लाभार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
3) घरकुल बांधकामास स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जागा असावी.
4) लाभार्थीचे स्वत:चे पक्क्या स्वरुपाचे घर नसावे.
5) यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.
3) रमाई आवास योजना :-
योजनेचा उद्देश :-
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील गरीब – गरजू, बेघर व कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी सहाय्य व अनुदान देणे.
निवडीचे निकष :-
1) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.
2) ग्रामीण क्षेत्रासाठी उत्पन्न मर्यादा रक्कम रु.1.20 लाख पर्यंत असावे.
3) लाभार्थ्यांकडे अनुसूचित जातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
4) महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे.
5) इतर योजनेतुन घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.
6) घर बांघकामासाठी स्वत:ची जागा असावी.
संपर्क
ग्रामपंचायत :- ग्रामसेवक, ग्रामपंचायत
पंचायत समिती :- गट विकास अधिकारी,
पंचायत समिती,
ग्रामीण गृहनिर्माण अभियंता.
जिल्हा परिषद :- प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे
पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजना व राज्य पुरस्कृत अन्य योजनेतील दारिद्रय रेषेखालील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाच्या लाभ मिळण्यापासुन वंचित आहेत, ही बाब विचारात घेऊन “पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना” सुरु करण्यात आली आहे . ही योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागु राहील.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी रु.50,000/-पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.
जागेची उपलब्धता
अ ) या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी 500 चौ.फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
ब) मोठया ग्रामपंचायती तसेच शहराशेजारील ग्रामपंचायतीमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता 500 चौ.फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रती लाभार्थी रु.50,000/-पर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
वरील (अ) व (ब) मध्ये जर क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी 500 चौ. फुटापर्यंत असल्यास प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रु.50,000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय लाभार्थ्यास देण्यात येईल. जागेची किंमत रु.50,000/- पेक्षा जास्त असल्यास व त्यावरील रक्कम लाभार्थी स्वत: देण्यास तयार असल्यास त्यास या योजनेचा लाभ देण्यात येईल.