यशेागाथा
-
तालुका: शहापूर
-
ग्रामपंचायत: भावसे
-
गाव: बिबीचापाडा
-
शीर्षक: माझे शेततळे माझी समृध्दी
कामाचे नाव: अमृतकुंड शेततळे (अस्तरीकरण)
-
लाभार्थ्याचे नाव - संजय कष्णा भोये
-
खर्च (लाखात): 4.46615/-
-
काम सूरु झाल्याचा दिनांक :20/01/2023
-
काम पूर्ण झाल्याचा दिनांक : 16/07/2023
-
मनुष्यदिन निर्मिती : 1349
कामाचा विवरण
ग्रामपंचायत भावसे येथील अ.जा प्रवर्गातील श्री. संजय भोये हा रोजंदारीवरील काम करणारा गरीब शेतकरी कुटुंबातील मजूर. सन 2022-23 मध्ये नरेगामधून त्यांना अमृतकुंड शेततळे योजनेचा लाभ मिळाला.
कामाची आवश्यकता:
ग्रामपंचायत भावसे येथील अ.जा प्रवर्गातील श्री. संजय भोये हे अल्पभुधारक शेतकरी असून लहानपणा पासूनच त्यांनी शेतीत प्रगती करण्याचा चंग बांधला होता. परंतु उन्हाळयात काय करावे कारण सिंचनाची सुविधा नसल्याने उन्हाळयात आपल्या उपजिवीकेसाठी रोजगार नसल्याने ते चिंतेत असायचे. त्यांना भाजीपाला करायची पण खुप इच्छा असायची पण पाणी नसल्याने त्यांनी नरेगा मधून शेततळे घेतले. ज्यामुळे भाजीपाल्यासाठी पाण्याची सोय तर झालीच पण उपजिवीकेसाठी शेततळयात मस्य बीज सोडल्याने शाश्वत उपजिवीकेचे साध्न निर्माण झाले..त्यामुळे ते आज यशस्वी शेतक-यांचया पंगती मध्ये दिसून येत आहेत.
आव्हाने:
भावसे येथील अल्पभूधारक शेतकरी श्री. संजय भोये यांना कमी जमीन असल्याने आपण शेततळे घेतले तर आपली जमीन वाया जाईल यांची भीती त्यांना वाटत होती. त्यातच ते प्रयोगशील शेतकरी असल्याने शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. आपल्या शेतात शेततळे घेवून त्यात मासे सोडून लखपती होण्याची त्यांची इच्छा पाहून गावातील बरेच जण त्यांना हसत होत. कमी जमीन त्यात आपल्याला शेततळयासाठी कोण मदत करणार हा प्रश्न त्यांना सतावत होता. पण या सर्व आव्हानांना मात करून त्यांनी नरेगा मधून अस्तरीकरण शेततळे घेतले आणि समृध्द शेतकरी दिशेने वाटचाल केली.
अंमलबजावणी प्रक्रिया
श्री. संजय भाये यांनी आपल्या शेतीत मनरेगा च्या माध्यमातुन 25X25 आकाराचे अस्तरीकरण सह शेततळे लाभ घेवून 38 मजुरांच्या साहाय्याने 4 महीन्यात अस्तरीकरण शेततळे काम पुर्ण केले .विशेष म्हणजे संपुर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाची सोय झाल्यामुळे कमीतकमी पाण्यावर भेाये यांची सगळी शेती फुललेली दिसत आहे.
व्यक्ती / लाभार्थी उल्लेखनीय योगदान (जसे शासकीय कर्मचारी/विभाग/जनप्रतीनीधी):
ग्रामपंचायत भावसे हे शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या जवळील गाव. नरेगाच्या माध्यमातुन 100 पेक्षा जास्त गरीब लाभार्थ्यांना सिंचन विहीर ,फळबाग लागवड ,मोगरा लागवड, बांध बंधिस्ती या सारख्या वैयक्तिीक लाभाच्या योजना राबविण्यासाठी कर्तव्यदक्ष ग्रामसेविका सदगीर मॅडम व ग्रामरोजगार सेवक रमेश वरठा यांनी ग्रामसभेच्या माध्यमातुन मनरेगा बाबत जनजागृती केली . या कार्यालयातील आमचे मार्गदर्शक गटविकास अधिकारी श्री. भास्कर रेंगडे साहेब व कृषी अधिकारी श्री. विलास झुंझारराव साहेब यांचे मार्गदर्शनातून मनरेगा कक्षातील सर्व कर्मचारी यांनी भावसे येथील अ.जा शेतकरी यांना अस्तरीकरण शेततळे लाभातून शाश्वत उपजिवीकेचे साधन निर्माण करून दिले.
प्रभाव (फलश्रुती):
भावसे येथील शेतकरी श्री. संजय भाये हे अस्तरीकरण शेततळे लाभ धेणे पुर्वी विट भटीवर तर कधी मजूरीसाठी बाहेर गावी जात होते. परंतु या वर्षी श्री. भेाये यांनी शेततळे मध्ये साठलेल्या पाण्यात मत्स्यपालन केले आहे.ज्यामध्ये रोहू, कटला व सायप्रीनस या जातीचे मत्स्यबीज सोडले असून त्या माश्याचे वजन आता 1 ते 1.5 किलो झाले असल्याने त्याची विक्री करून देखील त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा श्री. भाये करत आहेत.तसेच सिंचनाची सुविधा झाल्यामुळे भाजीपाला लागवड लाभार्थी दररोज किमान 500 ते 700 रू. रोज पैसे मिळत आहे. मनरेगा मधून मिळालेल अस्तरीकरण शेततळे आज लाभार्थी साठी समृध्दीचे आणि शाश्वत उपजिवीकेचे साधन निर्माण झाले आहे.
लाभार्थी मनोगत
नमस्कार मी श्री. संजय कृष्ण भाये रा भावसे ता. शहापूर जि.ठाणे येथील अ.जा .प्रवर्गातील गरीब शेतकरी असून मला लहानपणपासून शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थितीथी बिकट असल्याने मला माझ्या कुटुबाच्या उदारनिर्वाहासाठी गावात रोजगार नसल्याने बाहेर गावी रोजंदारीवर कामासाठी जावं लागत असे. परंतु आज महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ग्रांधी राष्ट्रिय रोजगार हमी योजने मधून मला अस्तरीकरण शेततळे चा लाभ मिळाला आणि मला समृध्दीचा मार्ग मिळाला. या शेततळयामुळे मला आज शाश्वत उपजिवीकेचे साधन तर मिळाले शिवाय सिंचनाची सोय झाल्यामुळे बारमाही शेती व भाजीपाला करून मला आर्थिक आवक वाढल्याने मी माझ्या कुटुंबाला सुखाने आणि आनंदाने सांभाळु शकतेा. शेततळयात रोहु ,कटला व सायप्रिनस या जातीच्या मत्स्यबीजामुळे मी भविष्यात लखपती बनू शकतो हे आज सिध्द झाले आहे. यासाठी मला वेळोवळी सहकार्य करण-या राहयो विभागाचे मी सर्दव आभारी राहीन व त्यामळे मी शासनाला व मनरेगा योजनेला धन्यवाद देत आहे.
// मनरेगा माझी मायेचा सागर
दिला तीने जीवना आर्थिक आधार
यशेागाथा
-
तालुका: अंबरनाथ
-
ग्रामपंचायत: मांगरुळ
-
गाव: मांगरुळ
-
शीर्षक: मनरेगामधुन स्वप्नपुर्तीकडे वाटचाल
कामाचे नाव: सिंचन विहीर
-
लाभार्थ्याचे नाव - दामोदर गणपत पाटील
-
खर्च (लाखात): 4 लाख
-
काम सूरु झाल्याचा दिनांक :03/04/2023
-
काम पूर्ण झाल्याचा दिनांक : 28/06/2023
-
मनुष्यदिन निर्मिती : 600
कामाचे विवरण
कामाची माहिती व आवश्यकता-
मी दामोदर गणपत पाटिल लाभार्थी राहणार मांगरुळ ता. अंबरनाथ जि.ठाणे येथील रहिवासी आहे माझा व्यवसाय शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याची माझी आवड आहे . मला भाजीपाला लागवड, फळबाग लागवड तसेच इतर पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांची मला आवड आहे. परंतु पाण्याच्या अभावामुळे मला आवड असूनही शेती करणे व भाजीपाला लागवड करणे मला साध्य करता आले नाही. मी ग्रामपंचायत मांगरुळ कार्यालयात गेलो असता मला ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्याकडून मनरेगाच्या योजनांची माहिती मिळाली. या योजनेमधील वैयक्तिक सिंचन विहीरीबद्दल माहिती मिळाली. त्यावरुन सिंचन विहीर लाभ मिळाल्यास पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होऊ शकते.
अंमलबजावणी प्रक्रिया
काम कसे राबविले गेले -
सिंचन विहीरीच्या कामाची सविस्तर माहिती सांगितली की, ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत हे काम घेण्यात येते, त्याबद्दल अधिक माहिती जसे की अर्ज त्यासाठी लागणारे, कागदपत्रे, योजनेचा लाभार्थी पात्र कसे करतात, त्याचा निधी कसा येतो त्याचे वितरण कसे होते याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हांला तालुक्यामधील पंचायत समिती, अंबरनाथ रोहयो विभाग येथे मिळेल त्यानुसार मी या कार्यालयात भेट दिली तेथून अर्ज घेतला व त्यासाठी लागणारे कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा केला. या सिंचन विहोरीच्या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 4 लक्ष इतके अनुदान शासनाकडून मिळते.
सिंचन विहीरीचा प्रस्ताव मला मंजूर करुन मिळाला मी लगेच खोदकामांस सुरुवात केली. सिंचन विहोरोचे काम वरिष्ठांच्या संपर्कात राहून पूर्ण केले. तसेच मजूरांना रोजगार उपलब्ध झाला. काम प्रगतीपथावर असतांना आठवडयाला मजूरी मिळत गेली. काम पूर्ण झाल्यावर बिल सादर केले. काही दिवसांनी मला त्या बिलाची रक्कम माझ्या खात्यावर जमा झाली. सिंचन विहीरीला भरपूर पाणी लागले व माझा पाण्याचा प्रश्नच कायमस्वरुपी मिटला.
कामाचं काय फायदे आहेत आणि यामुळे लाभाथ्यांचं जीवन कसे बदलले आहे.
मी शेतजमिनीवर वेग वेगळया भाज्या जसे की, वांगी, वाल, चवळी, काकडी, टोमॅटो, काकडी, मेथी, पालक, खरबूज, मिरची, कांदा इत्यादी लागवड केली. वेळेवर उपलब्ध सिंचन विहीरोंच्या पाण्याचा वापर केला आणि चांगली पिके तयार झाली. त्यातून माझे उत्पन्न वाढले. आर्थिक परिस्थितो सुधारली व यातून मला अंदाजे 1 ते 15 लाखांपर्यत नफा झाला. विविध पिकांमुळे जमिनीचा कस सुधारण्यास मदत झाली. सेंद्रीय पिकांमुळे माझ्या कामाचा दर्जा वाढला.