कर्तव्य :- अ- आर्थिक अधिकार
1.पंचायत समिती मधील वर्ग-3 व वर्ग-4
कर्मचाऱ्याचे वेतन, भत्ते व रजा मंजुर करणे.
2.कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतनवाढी मंजुर करणे. विविध प्रकारची अग्रीम मंजुर करणे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती
अधिनियम 1961
अधिकार प्रशासकीय
अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार
अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .
ब) वेतन वाढी मंजुर करणे.
क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.
ड) गोपनिय अहवाल लिहीणे.
इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.
ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे.
पंचायत समिती सभापती यांचे कर्तव्ये-
1) पंचायत समितीच्या बैठकी बोलावील, त्या बैठकीचे अध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.
2) पंचायत समितीचे अभिलेखे पाहू शकेल.
3) अंमलबजावणीच्या किंवा (पंचायत समितीने ठराव आणि निर्णय कार्यान्वित करण्याचे काम धरून) प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अधिलेख यांच्या बाबतीत गटात काम करणा-या जिल्हा परिषदाच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कृतींचे पर्यवेक्षण करील व त्यावर नियंत्रण ठेवील.
4) गट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत, मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यासंबंधात, राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.