पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत नाविन्यपुर्ण कामांची माहिती.
*सामान्य प्रशासन विभाग:-
1) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण 2517/ प्र.क्र. 372/ 17/आस्था -1 बांधकाम भवन , मर्झबान रोड, फोर्ट मुंबई 400001 दिनांक :3 ऑक्टोबर 2017 अन्वये “ झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ”(स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) जिल्हा परिषदा, पंचायत समिती, कार्यालयीन कामाकाजाची कार्यपध्दती अंतर्गत
अ):- कार्यालयातील दप्तर अभिलेखे अद्ययावत करून योग्य पध्दतीनेकार्यालयातील तसेच अभिलेख कक्षातील अभिलेखांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्यावतीकरण करण्यात आले आहे.
ब):-कार्यालयात प्राप्त आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी “ झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ” या कार्यपध्दतीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली आहे.
2) पंचायत समिती अंतर्गत सौर उर्जा संच बसविल्यामुळे विज बिलाची बचत झाली आहे.
* पाणी पुरवठा विभाग
सन 2017-2018 या वर्षी ग्रामिण पाणी पुरवठा उप विभाग पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत हाजीमलंगवाडी हदृीतील मौजे जकात नाका व पहाडावर अशी दोन ठिकाणी ऑस्ट्रेलियन पध्दतीच्या 1.00 लक्ष लिटर्स क्षमतेच्या पाणी साठवण टाकयांची बांधकाम करून पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली.
* शिक्षण विभाग
शिक्षण विभागअंतर्गत नाविन्यपुर्ण कामांची माहिती
1)ज्ञानरचनावादी शाळा -114
2) डिजीटल शाळा -114
3) प्रगत शाळा-103
4) नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणा-या शाळा -12
5) (दहिवली, नेवाळी, काकडवाल, ना-हेण, उसाटणे, द्वारली ,कासगाव, कान्होर, पिंपळोली, आंबेशिव बु, रहाटोली, मुळगाव)
6) बालिकादिन उपक्रम
7) मुक्त भिंतचित्र
8) कुस्ती स्पर्धा
9) लेक शिकवा अभियान
10) आदिवासी गरीब मुलींचा सत्कार
11) विज्ञान प्रयोग केंद्र भेट
12) डिजीटल माध्यमादवारे विदयार्थ्यांना आकाशदर्शन
13) महिला दिन उपक्रम अंतर्गत महिला सक्षमीकरणकरीता किशोरवयीन मुली सायकल रॅली- मुलींना शिकवा
देश वाचवा.
14) पालक / विदयार्थ्यांसाठी तक्रार पेटी
15) इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पुस्तके आणि स्वाध्याय वाटप
* मग्रारोहयो (MREGS)
1) सिंचन विहीरी 7 कामे पुर्ण करण्यात आले आहे.
2) शेळी गोठे-2 कामे करण्यात आले आहे.
3) गाईचे गोठे -2 कामे करण्यात आले आहे.
4) फळबाग लागवड -27 इ. कामे करण्यात आली आहेत.
* बांधकाम
तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत खालीलप्रमाणे कामे मंजूर करण्यात आलेली आहेत
1) मुळगाव येथे तलावाजवळ गणेश घाट बांधण्यात आला आहे.
2) मुळगाव तलाव सुशोभिकरणासाठी तलावाचे बाजुला पेव्हरब्लॉक बसविले आहेत.
3) मुळगाव येथे मोठे पथदिवे (हाय मास्ट) बसविण्यात आले आहेत.
* आरोग्य
आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे नाविन्यपुर्ण योजना राबिविण्यात आल्या आहेत.
1) आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील मुलांना गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात आली. अंबरनाथ गटाचे एकूण काम 77 % झाले आहे.
2) प्रधान मंत्री मातृ वंदना ही योजना गटात राबविण्यात आली व 63% काम झाले आहे.
* एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंबरनाथ नाविन्यपुर्ण योजनेची माहिती
1) पंचायत समिती सेस फंड अंतर्गत ग्रामपंचायत उसाटणे येथे 25 मुली व महिलाना ब्युटी पार्लरचे बेसिक प्रशिक्षण दिले.
2) जि.प उत्पन्नाच्या 10% निधी मधुन कुपाषित मुलांसाठी अतिरिक्त आहार पुरवणे अंतर्गत 165 मुलांना प्रतिदिन 1 कोंबडीचे उकडलेले अंडे व 2 कोळी असा आहार पुरविण्यात आला.
* पशुसंवर्धन विभाग नाविन्यपुर्ण उपक्रम
1) गाळ पेरा अंतर्गत अंबरनाथ तालुक्यातून 9 लाभार्थ्यांना मका बियाणे, Nutrifeed आणि बाजरी चे बियाणे वाटप करण्यात आले. हया दवारे 20 हेक्टर जमिनीवर हिरव्या चा-याची लागवड करण्यात आली.
2) विशेष घटक योजना अंतर्गत एक गाव अंडयाचे या नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत अंबरनाथ तालुकयातील जांभिळघर या गावातील 30 लाभार्थ्यांना कुक्कुट पालनाचा लाभ देण्याचे योजीले असून त्यांना लवकरच हया योजनेचा लाभ देण्यात येईल.
*स्वच्छ भारत मिशन नाविन्यपुर्ण उपक्रम
सन 2017-18 या वर्षी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पंचायत समिती, अंबरनाथ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कसे करावे यासाठी ग्रामपंचायतस्तरावर बचतगट महिलांच्या बैठका घेण्यात आल्या. ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात आले.तसेच मासिक पाळी व्यवस्थापन विषयी शाळांमधील व शाळा बाहय मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
* महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अंबरनाथ तालुक्यात आजतागायत एकूण 803 महिला स्वयं सहाय्यता समूहाची स्थापना केली असून एकूण 36 महिला ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे, हे सर्व समूह अभियानाच्या नियमाचे पालन करत आहेत तसेच अभियानामध्ये आल्यानंतर महिलामध्ये आत्मविश्वास वाढल्यामुळे महिला छोटया -छोटया व्यवसायाकडे वळल्या आहेत. या स्वयं सहायता समुहाचे गाव पातळीवर वैयक्तीक व गटाच्या तसेच ग्रामसंघाच्या मार्फत परसबागा लागवड, शेळीपालन, कुक्कुट पालन, खानावळ, चर्मउदयोग, रेडीमेड गारमेंटस, पापड व्यवसाय विविध प्रकारचे मसाले, नर्सरी, गांडूळखत, कटलरी,फिनेल, व लिक्विड सोप निर्मिती, पेपर बॅग व फॅन्सी बनवणे, अगरबत्ती व मेणबत्ती बनवणे, हस्तकला व शिल्पकला असे विविध प्रकारचे व्यवसाय असून या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्टया हातभार लावत आहे.
अंबरनाथ तालुकयातील अमृतवेल स्वयं सहायता गटाचा कपडयावर बांटिक प्रिंट हा नाविन्य पूर्ण व्यवसाय असून सदर व्यवसायास आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अभियान प्रयत्नशील आहे.
*एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकलप अंबरनाथ नाविन्यपूर्ण माहिती
1) पंचायत समिती सेस फंड अंतर्गत ग्रामपंचायत उसाटणे येथे 25 मुली व महिलांना ब्युटी पार्लरचे बेसिक प्रशिक्षण दिले.