प्रस्तावना
प्रस्तावना
भारतामध्ये सर्व प्रथम 1986 साली केंद्रीय पुरस्कृत ग्रामीण परिसर स्वच्छता कार्यक्रम (Central Sponsored Rural Sanitation Program) सुरु झाला. नंतर या कार्यक्रमाची सन २० ऑगस्ट २००३ या वर्षामध्ये संपुर्ण स्वच्छता अभियान (Total Sanitation Campaign) या नावाने केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मा. श्रीम. सुर्यकांता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तदनंतर सन २००३-२०११ या कालावधीत जिल्हयात संपुर्ण स्वच्छता अभियान या नावाने राबविण्यात आले. त्यानंतर दिनांक १/४/२०१२ या तारखेपासून संपुर्ण स्वच्छता अभियानाचे निर्मल भारत अभियान (Nirmal Bharat Abhiyan) असे नामकरण करण्यात आले. त्यावेळेस ठाणे जिल्हयाचा (ठाणे व पालघर) सर्व्हे करण्यात आला. त्यांनतर ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्हयाचे विभाजन करण्यात आले होते. २ ओक्टोबर २०१४ रोजी या अभियानाचे नामकरण देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अशी करण्यात आली. आणि या उपक्रमाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ म्हणून संबोधिण्यात आले.
सदयस्थितीत ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात एकुण ०५ तालुके व ४२६ ग्रामपंचायती व ७७७ महसुली गावे तर १९७५ गावपाडे वस्ती आहेत.
ठाणे जिल्हा मुंबई पासुन जवळ आहे. ठाणे जिल्हाचा विचार करता हा जिल्हा औदयोगिकरणात अग्रेसर आहे व नागरीकरण झपाटयाने होत आहे तसेच आदिवासी बहुल जिल्हा म्हणुन ठाणे जिल्हयाची ओळख आहे. २०१२ च्या पायाभुत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हयात एकुण ९१२२५ कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले व त्यानुसार ३१ मार्च २०१७ रोजी सन २०१२ च्या पायाभुत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हयातील ४२६ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषीत करण्यात आल्या.
ग्रामीण भागांतील लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागरुकता वाढविण्यासाठी आणि स्वच्छता सुविधांची मागणी निर्माण करण्यासाठी सन १९९९ पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून माहिती, शिक्षण व संवाद, मानवी संसाधन विकास, क्षमता उभारणी कार्यक्रम यावर भर देण्यात आला. स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण स्वच्छतेची खात्री करुन कचरा मुक्त करण्याच्या उद्देशाने दिनांक १/४/२०१२ पासून “निर्मल भारत अभियान” सुरु करण्यात आले. स्वच्छतेच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना राष्ट्रपिताच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला.
दिनांक २ ऑक्टोंबर २०१४ पासून स्वच्छतेचा हा कार्यक्रम “स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)” या नावाने सर्व भारतभर राबविण्यांत येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रये रेषेच्या वरील आर्थिकदृष्टया मागास कुटूंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यांत येते. तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम यासाठी ग्रामपंचायतींना अनुदान देण्यांत येते. सन २०२० पासून स्वच्छतेचा हा कार्यक्रम “स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)टप्पा-२” म्हणून संबोधिण्यात आला व त्यामध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन ची कामे करून जिल्हा हागणदारीमुक्त अधिक करण्याचे नियोजित करण्यात आले.तसेच वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करुन त्याची सवय लागावी व इतर सर्व स्वच्छतेच्या उपक्रमाचे महत्व ग्रामीण भागात जन सामान्य पर्यंत पोहचावे यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत माहिती शिक्षण व संवाद (IEC) आणि क्षमता बांधणी या घटकांवर विशेष भर दिला जातो.
स्वच्छ भारत मिशन बाबत ग्रामीण भागातील लोकांना प्रवृत्त करणे :-
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेबाबत प्रवृत्त करणे व त्यांना शौचालय बांधकाम करण व त्याचा वापर करण्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवुन आणणे ही एक मोठी समस्या होती.
त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना शौचालयाचे महत्व व त्याचे फायदे व तोटे हे व त्यापासुन येणारे दुष्पपरिणाम याबाबत लोकांमध्ये मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात आली व ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधकाम करणेसाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यासाठी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायतस्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
1. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर मेळावे, आढावा बैठका, गटचर्चा, विशेष ग्रामसभा, महिला सभा, कोपरा बैठका घेण्यात आल्या.
2. कलापथक, रोड शो, चित्ररथ, LED वाहन, स्थानिक वृत्तपत्रे, नाटक, घडिपत्रिका, बॅनर, चर्चासत्र, युवक मेळावे, महिला मेळावे, रॅली, एस.टी.महामंडळ जाहिरात, प्रशिक्षण. कार्यशाळा, गृहभेटी, स्टॉल इ. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमांतुन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन सांगण्यात आले व त्यांना शौचालय बांधकाम करुन त्यांचा वापर करणेसाठी प्रवृत्त करण्यात आले.
-
स्वच्छतेचा थेट आरोग्याशी काय संबंध आहे याचे देखील महत्व लोकांना पटवुन सांगण्यात आले.
स्वच्छता अभियानमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग :-
-
जिल्हयात भारत मिशन (ग्रा) अभियान राबविताना सर्व घटकांना सामावुन घेण्यात आले होते. पंरतु प्रत्यक्षात क्षेत्रिय भेटी दरम्यान असे निदर्शनास आले की, पाहिजे तेवढे यश मिळत नव्हते. त्यामुळे मग स्वच्छता अभियानामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याकडे लक्ष देण्यात आले.
-
घरात सर्वात जास्त संबंध स्वच्छतेचा महिलांशी येतो (धुणे-भांडी, पिण्याचे पाणी, घरातील परिसर, लहान मुलांची स्वच्छता, स्वयंपाक) त्यामुळे यामध्ये आम्ही जास्तीत जास्त महिलांना समाविष्ट करुन घेण्यात आले.
-
महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी महिलांच्या ग्रामसभा, ग्रामपंचायस्तरावर महिलांच्या बैठका, तालुकास्तरावर महिलांचे प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यास सहल व महिला बचत गटाच्या माध्यमातुन स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देऊन जास्तीत जास्त महिलांना या कामात समाविष्ट करुन घेण्यात आले.
-
उत्कृष्ट काम करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांचा सत्कार करण्यत आला व त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
-
महिला आर्थिक विकास महामंडळ, MSRLM इ. विभागांशी योग्य समन्वय साधुन महिलांचा सहभाग वाढविण्यात आला.
शाळेतील विदयार्थाचा सक्रिय सहभाग :-
-
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत काम करताना सर्व घटकांना सामावुन घेऊन काम करण्यात आले. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शाळेतील विदयार्थी. हे विदयार्थी देशाचे भावी नागरीक व देशाची संपत्ती असल्याने त्यांनाही यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले.
-
त्यासाठी शाळेतील मुलांच्या रॅली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, विदयार्थी स्वच्छतादुत हे उपक्रम जिल्हयात राबविण्यात आले व तसेच यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आम्हाला यश मिळाले.
-
लहन मुलांमार्फत कुटुंबांतील सर्व सदस्यांना स्वच्छतेबाबत जाणीव जागृती होण्यास मदत झाली.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी वापरण्यात येणारे मार्ग व माध्यमे :-
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमांचा वापर करण्यात येतो.
-
Whatssapp Group, Facebook, Bulk SMS, आंतरव्यक्ती संवाद, बाहय माध्यमे, रेडिओ, वृत्तपत्र जाहिरात, हस्तपत्रिका, घडिपत्रिका, दिनदर्शिका, दुरदर्शन वरील जाहिरात, प्रदर्शने, अभ्यास दौरा, प्रात्यक्षिके इ. माध्यमाचा वापर करुन जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेविषयी प्रवृत्त करण्यात आले.
इतर विभागांचा स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग :-
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हयात काम करताना यश प्राप्त झाले परंतु १००% यश प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत नव्हते. त्यामुळे जिल्हास्तरावर इतर विभागांचा सुदधा सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक होते.
-
शिक्षण विभाग - स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत काम करताना शाळेतील मुलांचा, शिक्षकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे तसेच शाळेतील मुलांना स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करुन प्रवृत्त करणेकरिता शिक्षण विभागाशी समन्वय ठेवण्यात येतो.
-
महिला व बालकल्याण विभाग – महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर काम करणा-या अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांची देखील ग्रामपंचायतस्तरावर मदत घेणे अपेक्षित होते त्यासाठी या विभागाशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत आहे.
-
आरोग्य विभाग- आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर काम करणारे आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती, जलसुरक्षक यांची देखील ग्रामपंचायतस्तरावर मदत घेण्यात येते.
-
MSRLM – MSRLM अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर काम करणा-या महिला बचत गटांचा देखील सक्रिय सहभाग घेणे घेण्यात आला .
-
वरील सर्व विभागाशी योग्य पदधतीने समन्वय ठेवण्यात आला त्यामुळे स्वच्छतेच्या कामात प्रगती दिुसुन
यशोगाथा
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वं शाळांमध्ये ‘हात धुवा’ मोहिम राबविण्यांत आली.
राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या सर्व ग्रामपंचायतीपर्यंत पोहचून शाश्वततेसाठी आग्रह धरणे व त्या अनुषंगाने स्थानिक सामाजिक व्यवस्था करणे.
-
हात धुवा मोहिम
-
ग्रामपंचायत नांदवळ यशोगाथा:-
-
नांदवळ ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 262 कुटूंबे असुन त्यातील 17 कुटूंबांकडे शौचालय असल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंब हि उघडयावर शौचास जात होती.
-
प्रथम नांदवळ ग्रामपंचायत मध्ये रोटरी क्लब ऑफ हिल हया सामाजिक संस्थेने भेट देऊन गावातील कुटूंबांची अडचण पाहुन तेथे शौचालय बांधकाम करणेसाठी पुढाकार घेतला.
-
शौचालय बांधकाम करणेसाठी प्राधान्याने युनिसेफ व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ठाणे यांच्या संयुक्त् प्रय त्नाने तांत्रिक मार्गदर्शन व लोकसहभाग मिळविण्यासाठी सहभाग दर्शविला.
-
रोटरी क्लब ऑफहिल यांचे निकषानुसार लाभार्थी हिस्सा 3000/- रु तर रोटरी क्लब ऑफ हिल यांचे 15000/- असे एकूण 18000/- रुपयांत शौचालय बांधकाम करण्यात आले.
-
रोटरि क्लब ऑफ.हिल या संस्थेमुळे एकूण 161 शौचालय बांधकामे पुर्ण करण्यात आली.
-
ग्रामपंचायत कोठारे, तालुका शहापुर यशोगाथा- (एक अदिवासी महिलेने घेतलेला पुढाकार)
-
बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 525 कुटूंबे असुन त्यातील 299 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. आदिवासी डोंगराळ भाग असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची उदासिनता दिसुन आली. मोठया प्रमाणात हि कुटूंब उघडयावर शौचास जात होती.
-
गावात आदिवासी सरपंच श्री मधुकर भसाडे व महिला उपसरपंच श्रीमती सखुबाई भस्मा यांच्या प्रयत्नाने एकूण 75 शौचालय बांधकामे पुर्ण झाली आहेत. आजमितीस उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
-
ग्रामपंचायत खरीवली,तालुका शहापुर यशोगाथा:- (एका उपसरपंचाने शौचालयाकरीता केलेला सहकार्य )
-
बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 372 कुटूंबे असुन त्यातील 311 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. खरीवली स ही ग्रुप ग्रामपंचायत असुन यात जमिन पाण्याची (दलदलीची) व अडचणीची असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची काम करतांना प्रथम सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेऊन जिल्हा व तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचतगट तसेच ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन उपसरपंच श्री योगेश कष्णा भोईर यांनी पुढाकार घेऊन गावात विट,सिमेंद,रेती, शौचालय भांडी ,सिमेंट पत्रे ,बेसीन व गवंडी उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली व कामास गति मिळाली.
-
ग्रामपंचायतीमध्ये एकूण आजमितीस 181 कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरित कामे प्रगति पथावर आहेत.
-
ग्रामपंचायत चरगाव व आंबेशीव,तालुका अंबरनाथ यशोगाथा:-(महिला ग्रामसेवकाचे प्रयत्न पण योजनेकडे गावक-यांची पाठ )
-
ग्रामपंचायत चरगाव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 611 कुटूंबे असुन त्यातील 390 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती भोईर यांनी आदिवासी सरपंच यांच्या मदतीने स्वत: साहिल्य खरेदीकरुन शौचालय बांधकामास सुरुवात केली यात गावाचा कोणताहि सहभाग नसतांना 310 कुटूंबांकडे शौचालय बांधकाम करण्याचे काम केले.
-
योजना शासनाची आहे त्यामुळे बांधकामे शासनाने करावी अशी गावक-यांची धारणा आहे , परंतु ग्रामसेवकांचे योजना राबविण्यासाठी प्रयत्न
-
ग्रामपंचायत आंबेशीव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 321 कुटूंबे असुन त्यातील 244 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. त्यापैकी 150 कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती चव्हाण यांनी प्रयत्न शौचालय बांधकामे पुर्ण केली व पुढील कामे प्रगतिपथावर आहेत.
-
कळमगाव ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 916 कुटूंबे असुन त्यातील 627 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले .उर्वरित कुटंबांकडे शौचालय असुन ते त्याचा वापर करत होती.
-
प्रथम कळमगाव ग्रामपंचायत मध्ये ग्राम सेवक संजय बाळकृष्ण सावंत व सरपंच राजश्री राजेंद्र घाटाळ व उपरसरपंचसंदेश जनार्दन भांडवे यांनी जिल्हा परिषद ठाणे येथील स्वच्छ भारत मिशन चे सल्लागार यांची भेट घेवुन योजना समजुन घेतली नंतर ग्रामपंचायत मध्ये पाडा वस्तीनिहाय बैठका घेतल्या शौचालयाबाबत जन जाग्रुती केली. ग्रामस्थांची आर्थिकबाबतीतील विवंचना पाहुन ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व स्थानिक पुरवठा दाराकडुन शौचालय करीता लागनारा साहित्य खरेदी उधारी स्वरुपात मागविण्यात आले. यातुन 205 शौचालय बांधकाम पुर्ण करण्यात आली. मोठ्या स्वरुपात बांधकामे पुर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदे कडुन मिळणारा प्रोत्साहन निधी कुटुंबानी एकत्रित स्वरुपात जमुन तोपुरवठा दारास देण्यात आला. आता विश्वासामुळे मोठ्या संख्येने कळमगाव ग्रामपंचायतीमध्ये कामे चालु आहे.
-
हे काम करित असताना तेथे गवंड्याच्या प्रशिक्षित चार जोड्या यांचा मोठा सहकार्य लाभला पुर्ण शौचालय बांधकाम होई पर्यंत गवंड्यांनी मजुरी मागितली नाही. यात प्राधान्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यकुशलतेची सचोटी दिसुन येते.
-
आवरे ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 689 कुटूंबे असुन त्यातील 472 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. 207 कुटुंबे शौचालयाचा वापर करत होती. आवरे ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पाडे वाडे वस्ती असल्याचे दिसुन आले.
-
ग्रामपंचायत आवरे मध्ये ग्राम सेवक दिलीप गोपाळ जाधव यांच्या पुढाकाराने प्रथम ग्रामसभेचे नियोजन करुन सरपंच व उपसरपंच यांच्या सहकार्याने ग्रामसभा, पाडासभा व वस्तीसभा घेवुन ग्रामस्थामध्ये शौचालयाबाबत जनजागृति श्री. जाधव ग्रामसेवक यांनी आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहुन ग्रामपंचायत कडुन शौचालय बांधकामाचे साहित्य यात विटा, रेती, सिमेंट, पत्रे, दरवाजे, शौचालयाची भांडे बेसीन, पाईप उधारी घेवुन व प्रशिक्ष्ण दिलेले गवंडी यांच्या मार्फ़त शौचालय बांधकाम सुरवात केली. यात प्रथम प्राधान्य शौचालयाचा खड्डा तयार करण्या-यास देण्यात आला. यामध्ये शौचालयाचा खड्डा असणा-यास साहित्य वाटप करण्यात आले.
-
यामधुन ग्रामसेवक जाधव यांनी शौचालयाची बांधकामाची मोजमापे दिली व शौचालय बांधकामास प्रत्यक्ष सुरवात झाली.
-
जो प्रथम शौचालयाचे काम करेल त्यास 12,000/- प्रोत्साहन निधी देवुन गौरवण्यात येईल. यातुन आदिवासी भागातील जांभुलपाडा व काटिचापाडा येथे 100% शौचालय बांधकामे पुर्ण झाले. आजमितीस 386 शौचालय बांधकाम पुर्ण असुन त्याचा वापर होत असल्याचे दिसुन येते.