पशुसंवर्धन विभाग
प्रस्तावना
प्रस्तावना
पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवुन शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्यांबाबत माहिती देणे हे या विभागामार्फत केल्या जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने, दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिल्या जातो.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. ठाणे हे विभागाचे प्रमुख असून, निरनिराळ्या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतात. तसेच ते केंद्रस्तर व राज्यस्तर व जिल्हा परिषद उपकारमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करतात.
विभागाची संरचना
-
विभागाचे नांव :- पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद ठाणे
-
विभागाची संरचना :- 1. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
2.पशुधन विकास अधिकारी (तात्रिक)
3. पशुधन विकास अधिकारी (तालुकास्तर)
4. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी (तालुकास्तर)
5. पशुधन पर्यवेक्षक (तालुकास्तर)
6.वृणोपचारक ( तालुकास्तर)
मुख्यालयीन कर्मचारी
7. सहाय्यक प्रशासन अधिकारी - 1
8.कनिष्ठ प्रशासन अधिकारी - 1
9. वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) - 1
10.कनिष्ठ सहाय्यक (लेखा) - 1
11.कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) - 1
12. वाहन चालक - 1
13. शिपाई (वर्ग-4) – 2
-
कार्यालयीन कामकाजाची वेळ
-
सकाळी 09.45 ते सायंकाळी 06.15
सर्व शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून.
विभागाचे ध्येय
जिल्हयातील पशुपालकांना सोयी सुविधा पुरविणे.
पशुआरोग्य सेवा देणे.
रोग नियंत्रण करणे.
पशुसंवर्धन विभागांतर्गत येणा-या सर्व योजनांची माहिती जिल्हयातील पशुपालकांना देणे.
सदर योजनांचा लाभ घेणेस प्रवृत्त करणे व त्यांचा आर्थिक दर्जा वाढविणे.
संकरित गो-पैदास कार्यक्रम राबविणे
शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुप व्यवसाय उपलब्ध करुन देणे त्यांचे आर्थिक जिवनमान उंचावणे व प्रगती होणे
विभागाची कार्यपध्दती
पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचे नियंत्रण करणे.
कर्मचा- यांच्या आस्थापना विषयक बाबीची पुर्तता करणे.
पशुसंवर्धन विषयक सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे.
अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल
विषयाचे कार्यासननिहाय वाटप
विभागांतर्गत विविध समित्या
विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती
विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)
नागरीकांची सनद अनुसूची
अंदाजपत्रक
झालेल्या सभांचे इतिवृत्त
अर्ज नमुने
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक
आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी
यशोगाथा