ग्रामपंचायत विभाग

प्रस्तावना

प्रस्तावना

ठाणे जिल्ह्यातील पुर्णत: पेसा तालूका:-शहापूर

ठाणे जिल्ह्यातील अंशत: पेसा तालूके:-मुरबाड-76 गावे, भिवंडी-72गावे

ठाणे जिल्ह्यातील बिगर पेसा तालूके :- अंबरनाथ,कल्याण

 अक्र

      तालुका

    ग्रा.प. संख्या

पेसा ग्रा.प.संख्या

    महसूल गावे

   पाडे/ वाडया, वस्त्यांची संख्या

      पेसा गाव  निर्मिती   साठी ठराव करण्यात आलेल्या गावांची संख्या

उपविभागीय   अधिकाऱ्याकडे पाठविलेले प्रस्ताव

उपविभागीय अधिकारी यांचे कडून जिल्हाधीकारीयांचेकडे पाठविलेले प्रस्ताव

जिल्हाधीकारी यांचे कडून विभागीय आयुक्तांकडे पाठविलेले प्रस्ताव

1

भिवंडी

121

39

72

242

177

104

104

104

2

शहापूर

110

110

226

411

367

314

314

314

3

मुरबाड

126

55

101

102

116

115

115

115

 4

अंबरनाथ

28

0

64

-

-

-

-

-

5

कल्याण

46

0

84

-

-

-

-

-

 

एकुण

431

204

547

755

660

533

533

533

ग्रामपंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकारी(पंचायत),ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या संवर्गाचे आस्थापना विषयक कामकाज, सेवाविषयक बाबी, अनुकंपा विषयक,पंचायत समितीस्तरावरील विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या बैठका, कर्मचारी प्रशिक्षण,ग्रामपंचायत पातळीवरील प्रशासकिय कार्यवाहीबाबतचे विवेचन, जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित 

 

विभागाची संरचना

संपर्क

  1.  

    कार्यालयाचा पत्ता/दुरध्वनी क्रमांक/E-mail ID

    १) कार्यालयाचा पत्ता-ग्रामपंचायत विभाग,दुसरा मजला, प्लॉट नं. ए-१०६, ए-१०७, एस.जी.बर्वे रोड,

    जी.एस.टी.भवन समोर, वागळे इस्टेट, एम.आय.डी.सी. ठाणे (पश्चिम) पिन कोड-400604

    २) कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक - 022-20812916

    ३) कार्यालयाचा ईमेल आयडी -vpzpthane@gmail.com

    ४)कार्यालयाचा शासकीय मेल-आयडी - dyceovp.zpthane-mh@gov.in

     

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ०९.४५  ते सांयकाळी ०६.१५
महिन्यातील प्रत्येक शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून

 

विभागाचे ध्येय

आमचे/विभागाचे ध्येय

“ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांना पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे ग्रामपंचायतींचा सर्वांगिण विकास करणे”

“अभ्यांगताकडुन प्राप्त होणा-या तक्रारीचे निराकरण करणे”

“पंचायत राज समिती,महालेखाकर व स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन सादर करुन 100 टक्के परिच्छेद निकाली काढणे”

“मा.विभागीय आयुक्त कोकाण भवन यांनी जिल्हा परिषदेच्या केलेल्या वार्षिक दप्तर तपासणीचे मुद्दे 100 टक्के निकाली काढणे”

“ग्रामपंचायत विभागाकडील ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी(पंचायत) या सवंर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे संपुर्ण आस्थापना विषयक कामकाज,सेवा विषयकबाबी,  सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, कर्मचा-यांच्या बदल्या,अनुकंपा मधिल प्राप्त उमेदवारांचे प्रस्ताव सादर करणे, जाहिरात देउन पदभरती करणे,अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकिय देयके मंजुरी इ. बाबत कार्यवाही करणे”

 

विभागाची कार्यपध्दती

विभागाची कार्यपध्दती

ग्रामपंचायत विभागात सर्वसाधारण 16 शाखा असून ग्रामपंचायत विभागा अंतर्गत  विस्तार अधिकारी(पंचायत),ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या सवंर्गातील कर्मचा-यांची भरती, बाढती बदल्या, अनुकंपा पध्दतीने नोकरी देणे, भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम मंजूर करणे, वैद्यकीय बिल मंजूर करणे, विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा फिरती कार्यक्रम व मासिक दैनंदिनी मंजूर करणे, जिल्हा परिषद व शासन स्तरावरील सभेची माहिती संकलित करणे, माहिती अधिकारान्वये माहिती उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी  व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील  सरपंच/सदस्यांचे,अधिकारी व कर्मचारी  प्रशिक्षण आयोजन करणे. जिल्हा ग्राम विकास विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतीना कर्ज मंजुर करणे. कै आर आर (आबा) पाटील सुदंर गाव योजनांची अंमलबजावणी करणे. 15 वा वित्त आयोगाचे अनुदान ग्रामपंचायतींना वितरीत करणे. शासन स्तरावर प्राप्त मुद्रांक शुल्क अनुदान ग्रामपंचायतीना वाटप करणे. पेसा कायदा 1996 अंमलबजावणी व प्रशिक्षण आयोजित करणे. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पेसा गावांना गौण वनोपज करीता एकवेळेचे अर्थसहाय्य देणे. ५ टक्के अबंध निधी पेसा गावांना वितरीत करणेबाबत संनिंत्रण व अहवाल सादर करणे.ग्रामपंचायतींचा विकास करणेकरिता जनसुविधा,नागरी सुविधा,तिर्थक्षेत्र विकास,ग्रामीण कोकण पर्यटन या योजना राबविणे. आमच गांव आमचा विकास योजनेंतर्गत विविध उपक्रम चालविणे.प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण व सर्वांगिण विकास करणे.जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित विभागाकडे पाठविणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे.पंचायत राज समिती, महालेखाकार, स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन करणे.

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे  नाव

पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

1

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

श्री. प्रमोद बाळकृष्ण काळे

ठाणे

वर्ग-01

21/09/2022

022-253447268

131280/-

2

सहा. गट विकास अधिकारी

श्री. पंडीत कौरु राठोड

ठाणे

वर्ग-02

 

022-253447268

155397/-

3

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री. विवेक पवार

मुरबाड

वर्ग-3

01/04/2021

022-253447268

82473/-

4

विस्तार अधिकारी (पंचायत)

पद रिक्त

5

कनिष्ठ लेखा अधिकारी

रिक्त पद

6

वरिष्ठ सहाय्यक

श्री पदमाकर राठोड

बदलापुर

वर्ग-3

4/8/2021

022-253447268

75270/-

7

वरिष्ठ सहाय्यक

श्रीम. सोनाली तिकोने

बदलापुर

वर्ग-3

30/5/2022

022-253447268

73092/-

8

वरिष्ठ सहाय्यक

श्रीम मनाली गावडे

 

घाटकोपर

वर्ग-3

01/4/2021

022-253447268

 

77871/-

9

वरिष्ठ सहाय्यक

श्री प्रमोद श्रीपती पाटील

दिघा

वर्ग-3

18/03/2024

022-253447268

53490/-

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे  नाव

पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

10

कनिष्ठ सहाय्यक

श्री. संदिप पवार

पनवेल

वर्ग-3

23/10/2024

022-253447268

63711/-

11

कनिष्ठ सहाय्यक

श्री. दिपक गायकवाड

कल्याण

वर्ग-3

01/10/2024

022-253447268

63699/-

12

कनिष्ठ सहाय्यक

श्री. श्रीकांत चौधरी

बदलापूर

वर्ग-3

30/5/2022

022-253447268

67428/-

13

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम. सविता गायवळ

डोंबिवली

वर्ग-3

4/8/2021

022-253447268

61608/-

14

कनिष्ठ सहाय्यक

श्री. श्रीनील माणगावकर

ठाणे

वर्ग-3

28/10/2024

022-253447268

37800/-

15

कनिष्ठ सहाय्यक

पद रिक्त

16

कनिष्ठ सहाय्यक

पद रिक्त

16

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

श्री प्रशांत वेखंडे

मुरबाड

वर्ग-3

13/8/2021

022-253447268

43078/-

17

वाहन चालक

श्री.आर.व्ही.

पवार

मु.पो. बळेगाव, ता. मुरबाड

वर्ग-3

2/9/2013

022-253447268

66410/-

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/ कर्मचाऱ्यांचेनाव

पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

18

शिपाई

श्री दिपक बबन फर्डे

शहापूर

वर्ग-4

05/07/2023

022-253447268

69425/-

19

शिपाई

श्री.मंगेश रघुनाथ चव्हाण

मु.पो.ता. मुरबाड जिल्हा ठाणे

वर्ग-4

01/6/2017

022-253447268

45701/-

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

पदनाम

कर्तव्ये

1

आस्थापना-1

ग्रामसेवक संवर्गाचे आस्थापना विषयक संपुर्ण कामकाज

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

ग्रामसेवक प्रशिक्षण

न्यायालयीन प्रकरणे(ग्रामसेवक)

15 वा वित्त आयोग संपुर्ण कामकाज

वरिष्ठानी वेळोवेळी सोपविलेली कामे.

2

आस्थापना-2

विस्तार अधिकारी व ग्राम विकास अधिकारी संवर्गाचे आस्थापना विषयक संपुर्ण कामकाज प्रशिक्षण व पुरस्कारासह

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आस्थापना विषयक कामकाज(सेवाजेष्ठता/पदोन्नती/वेतन इत्यादी)

माहितीचा अधिकार अर्ज,प्रथम अपील व व्दितीय अपील अर्ज प्राप्त प्रकरणे व त्याबाबतची पुर्तता व नोंदवही अद्यावत करणे व अहवाल सादर करणे

न्यायालयीन प्रकरणे(विस्तार अधिकारी,पंचायत  व ग्रामविकास अधिकारी)

वरिष्ठानी वेळोवेळी सोपविलेली कामे

3

आस्थापना-2अ

ग्रामपंचायत विभागाकडील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक संपुर्ण कामकाज

ग्रामपंचायत विभागाकडील सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे/कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरणे व सेवानिवृत्ती नंतरचे लाभा विषयक संपुर्ण कामकाज (विभागातील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी,ग्रामसेवक,ग्राविअ,विस्तार अधिकारी ग्रा.प.)

यशवंत पंचायत राज अभियान

नागरिकांची सनद

लोकायुक्त/उपलोकायुक्त प्रकरणे

वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे (आस्थापना विषयक)

आस्थापना विषयक संपुर्ण बाबीचे अहवाल सादर करणे

वरिष्ठानी वेळोवेळी सोपविलेली कामे

4

योजना-1

जनसुविधा योजना

नागरी सुविधा योजना

तिर्थक्षेत्र विकास योजना

कोकण पर्यटन योजना

सांसद/आमदार आदर्श ग्राम योजना

नाभिक समाजातील लाभार्थ्याकरीता केशकर्तनालयासाठी खुर्ची पुरविणे

अल्पसंख्याक समाजासाठी मुलभुत सुविधा पुरविणे

आपले सरकार पोर्टल

कार्यालयाचे दोन्ही ई-मेल आयडीवर प्राप्त झालेले ई-मेल वेळच्या वेळी प्रिंट काढुन त्यावर तसा शिक्का मारुन क.प्र.अ.व सहा.ग.वि.अ. यांचेमार्फत अवलोकनार्थ सादर करणे

वरिष्ठानी वेळोवेळी सोपविलेली कामे

5

योजना-2

शहापुर व कल्याण तालुक्यासंबधी प्राप्त होणा-या सर्व तक्रारी संबधी संपुर्ण कामकाज

ग्रामपंचायत कर वसुली (घरपट्टी/दिवाबत्ती/पाणीपट्टी/आरोग्य) व इतर

ग्रामपंचायत मागासवर्ग 15 टक्के, महिला व बालकल्याण  10 टक्के, दिव्यांग 5 टक्के

झिरो पेन्डंसी बाबत अहवाल तयार करणे

लोक अदालत

जमीन महसुल अनुदाने,अकृषिक कर,

सौभाग्य योजना व स्वामित्व योजना

ASSK बाबत प्रशासकिय कामकाज

गौण खनिज अनुदाने व जमीन समानीकरण अनुदाने

मागास  व आदिवासी क्षेत्र अनुदाने, ठोक अंशदान

मुंद्राक शुल्क योजना

करांची फेर आकारणी

अभिलेख  कक्ष

वरिष्ठानी वेळोवेळी सोपविलेली कामे

6

लेखा

ग्रामपंचायत विभागाकडील लेखा विषयक संपुर्ण कामकाज

विभागाकडील कॅशबुक अद्यावत करणे

पंचायत राज समिती/स्थानिक निधी लेखा/ महालेखाकार यांचेकडील जि.प. व ग्रा.प. स्तरा वरील लेखापरिक्षण विषयक कामकाज

योजनांच्या खर्चाचा ताळमेळ

ग्रामपंचायत विभागाकडील कंत्राटी ग्रामसेवक मानधन,वकील फी सह सर्व देयके व तरतुद वाटप

ASSK लेखा विषयक कामकाज

वित्त विभागाकडील खर्चाचा ताळमेळ

डेड स्टॉक नोंदवही/दुरध्वनी नोंदवही/साठा नोंदवही अद्यावत करणे

ग्रामपंचायत विभागाकडील संगणक,झेरॉक्स, मशीन  देखभाल व दुरुस्ती व देयके

ग्रामपंचायत विभागाकडील स्टेशनरी मागणी व त्या अनुषंगिक वितरण

ग्रामपंचायत कर्मचारी  वेतन व तरतुदी विषयक सर्व कामे बजेट तरतुद वाटप

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

7

प्रशासन 01

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील  कलम7,14,16,39(1),40 इ.अंतर्गत सर्व बाबी

सरपंच/उपसरपंच/सदस्य यांचे  प्रशिक्षण,रिक्त पदे राजिनामा,अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करणे इत्यादी.

गावठाण विस्तार व त्या अनुषंगिक सर्व कामकाज

जैव विविधता,माझी वसुधंरा

ग्रामसभा,मासिक सभाबाबत कामकाज

सरपंच व सदस्य मानधन वाटप व बैठक भत्ता

पुनर्वसित गावाबाबत कामकाज

आठवडा बाजार

नवीन ग्रामपंचायत/गाव‍ स्थापन करणे/ ग्रामपंचायत विभाजन

ग्रामपंचायत कडील पाणीपुरवठा व स्वच्छता विषयक कामकाज

वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे

ग्रामपंचायत स्तरावरील झिरो पेन्डंसी

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

8

प्रशासन-2

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा/योजनांची सभा व इतर सर्व सभाचे अनुपालन,माहिती संकलन

न्यायालयीन प्रकरणांची माहिती संकलीत करणे व मासिक अहवाल तयार करणे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडुन मागविण्यांत आलेली माहिती सादर करणे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सहय्यक गविअ (पंचायत) यांचा संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनदिनी बाबत कामकाज

वाहन दुरुस्ती,लॉगबुक हिस्ट्री बुक नोंदवही व त्या अनुषंगिक सर्व कामकाज

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,सहय्यक गविअ (पंचायत) व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या सर्व स्तरावरील सभाचे अनुपालन,माहिती संकलन

पंचायत राज‍ समिती/अनु.जाती./अनु.जमाती/ वि.जा.भ.ज./इ.मा.व.समितीचे कामकाज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश

जकात कर अनुदाने व यात्राकर अनुदाने

कै.आर.आर आबा पाटील सुंदर गाव योजना

ग्रामपंचायत लेखा परिक्षण अहवाल

27 गावे विकास प्राधिकरण

ग्रामपंचायतीकडील पथदिवे व पाणीपुरवठा योजना विज देयके संदर्भातील संपुर्ण कामकाज

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

9

प्रशासन03

भिवंडी व मुरबाड तालुक्यासंबधी प्राप्त होणा-या सर्व तक्रारी संबधी कामकाज

कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी

मा.विभागीय आयुक्त/मु.का.अ/खातेप्रमुख यांचेकडील दप्तर तपासणी कामकाज

भष्ट्राचार निमुर्लन/जनता दरबार/लोकशाही दिन

घरकुल योजने संबधी प्राप्त संदर्भावर कार्यवाही करणे

तालुका दप्तर तपासणी

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

10

प्रशासन03 अ

जिल्हा परिषदेचे स्थावर व जंगम मालमत्ता संबधी संपुर्ण कामकाज

ग्रामपंचायत विभाग क्षेत्रातील स्थावर व जंगम मालमत्ता हस्तातंरण

ग्रामपंचायत अपहार प्रकरणे

ग्रामपंचायत दप्तर तपासणी

ग्रामपंचायत सखोल तपासणी

अतिक्रमणे/अनाधिकृत बांधकामे

बांधकाम परवाना/विकास आराखडा/ भिंतीपत्रके वितरण

अंबरनाथ तालुक्यासंबधी प्राप्त होणा-या सर्व तक्रारी

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन प्राप्त संदर्भावर कार्यवाही करणे

रास्त धान्य दुकानासंबधी प्राप्त संदर्भावरकार्यवाही करणे

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

11

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान

(RGSA)

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान

-बांधकाम, प्रशिक्षण

12

पेसा कक्ष

पेसा कायदा 1996अंमलबजावणी व प्रशिक्षण,वन हक्क कायदा 2006

13

नोंदणी शाखा

आवक व जावक संपुर्ण कामकाज

विशेष संदर्भ नोंदवहया अद्यावत करणे

माहिती अधिकार व प्रथम अपील/व्दितीय अपील अर्ज नोंदवही अद्यावत करणे

कार्यविवरण/प्रकरण नोंदवही एकत्रित गोषवारा नोंदवही अद्यावत ठेवुन अहवाल सादर करणे

प्रलंबित संदर्भ अहवाल सादर करणे

झिरो पेन्डंसी बाबत अहवाल तयार करणेकामी मदत करणे

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे

 

विभागांतर्गत विविध समित्या

अ.क्र.

समितीचे नाव

समितीचे सदस्य

समितीचे उद्दीष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत

 

 

 

 

     

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्र.

योजनेचे नाव

योजनेचा उद्देश(दोन ओळीत)

लाभार्थी/पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव  व दुरध्वनी क्रमांक-

1

जिल्हा वार्षिक योजना जन  सुविधे करीता वि्शेष अनुदान योजना

ग्रामीण भागात स्मशानभुमी/दफ़नभुमी ची व्यव्स्था करणे व ग्रामपंचायतीचे काम एकत्रीतपणे व सुयोग्यरीत्या चालण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध करुन देणे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती व महसुल गाव

योजना-1

2

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी  वि्शेष अनुदान योजना

5000 ते 10000 हजार लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायतीमध्ये राहणीमान दर्जेदार होण्यासाठी शहराच्या तोडीच्या मुलभुत सुविधा व रोजगार उपलब्ध करुन देणे

1.पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पहिल्या वर्षाचे निकष पुर्ण केलेल्या व लोकसंख्या 10000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा  पर्यावरण विकास आराखडा  करणे बंधनकारक आहे.

योजना-1

2. वरील 1 व्यतिरिक्त पर्यावरणसंतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पहिल्या वर्षाचे निकष पुर्ण केलेल्या व लोकसंख्या 5000 चे वर आणि 10000 पेक्षा जास्त कमी असणा-या व पर्यावरण संवेदनशिल भागामध्ये समावेश होणा-या , तिर्थक्षेत्र/पर्यटन क्षेत्र दृष्ट्या महत्व असणा-या  ओदयोगिक क्षेत्रात येणा-या प्रमुख नागरी क्षेत्राच्या  5 किमी परिघामध्ये येणा-या ग्रामपंचायती पर्यावरण विकास आराखडा तयार करु शकतील .

3

स्मार्ट ग्रामयोजना

महाराष्ट्र राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणणे .

ग्रामविकास व जलसंधारण वि्भागाकडील शासन निर्णय क्र. व्हीपीएम2610/प्र.क्र.1/पंरा-4,मंत्रालय मंबई दिनांक-18 आगस्ट 2010 रोजीच्या शासन निर्णयामधे मुद्दा क्र. 7 मधील प्रथम , व्दीतीय , तृतिय वर्षाच ग्रामपंचायतीचे पात्रतेचे निकष शासन निर्णया प्रमाणे असतील.

योजना-2

4

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकणातील ग्रामीण भा्गातील भुमी पुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे करीता ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास हो्णा-या  गावामध्ये पर्यटनाची पायभुत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावाचा विकास करणे.

जिल्ह्यातील समुद्र विकास व समुद्र किना-याची गावे (4 ते 5 गावे फ़क्त).

योजना-1

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र.

विषय

दस्तऐवजाचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाच्या नोंदी

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30वर्षे

6

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयाची केलेली तपासणी

30वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी/कार्यालयाची केलेली तपासणी

10वर्षे

8

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारीची चौकशी

10वर्षे

9

कार्यविवरण/प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10वर्षे

10

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5वर्षे

11

नियतकालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिेक प्रगती अहवाल

1वर्षे

 

नागरीकांची सनद अनुसूची

 

ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद ठाणे

महाराष्ट्र शासकिय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमयन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ कलम ८ मधील तरतूदीनूसार ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद ठाणे नागरिकांची सनद प्रसिध्द करीत आहे.

नागरिकांची सनद

1. प्रस्तावना

        ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषद ठाणे प्रशासकीय विभागाचा महत्वपूर्ण विभाग असून त्यात सर्वसाधारण 16 शाखा असून विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा फिरती कार्यक्रम व मासिक दैनंदिनी मंजूर करणे, जिल्हा परिषद व शासन स्तरावरील सभेची माहिती संकलित करणे, ग्रामपंचायत अंतर्गत  विस्तार अधिकारी(पंचायत),ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक इ. कर्मचा-यांची भरती, बाढती बदल्या, अनुकंपा पध्दतीने नोकरी देणे, भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम मंजूर करणे, वैद्यकीय बिल मंजूर करणे, माहिती अधिकारान्वये माहिती उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी  व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील  सरपंच/सदस्यांचे,अधिकारी व कर्मचारी  प्रशिक्षण आयोजन करणे. जिल्हा ग्राम विकास विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतीना कर्ज मंजुर करणे. कै आर आर (आबा) पाटील सुदंर गाव योजनांची अंमलबजावणी करणे. 15 वा वित्त आयोगाचे अनुदान ग्रामपंचायतींना वितरीत करणे. शासन स्तरावर प्राप्त मुद्रांक शुल्क अनुदान ग्रामपंचायतीना वाटप करणे. पेसा कायदा 1996 अंमलबजावणी व प्रशिक्षण आयोजित करणे. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पेसा गावांना गौण वनोपज करीता एकवेळेचे अर्थसहाय्य देणे. ५ टक्के अबंध निधी पेसा गावांना वितरीत करणेबाबत संनिंत्रण व अहवाल सादर करणे.ग्रामपंचायतींचा विकास करणेकरिता जनसुविधा , नागरी सुविधा , तिथक्षेत्र , या सारख्या सुविधा पुरविणे. आमच गांव आमचा विकास योजनेंतर्गत विविध उपक्रम चालविणे.प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण व सर्वांगिण विकास करणे.जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित विभागाकडे पाठविणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे.पंचायत राज समिती,महालेखाकार,स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन करणे.ग्रामपंचायत विभागाशी संबधित न्यायालयीन प्रकरणी जिल्हा परिषदेच्या विरुद्ध जनतेने अथवा अन्य प्राधिकरणांनी दाखल कलेल्या केसेस बाबत जिल्हा परिषदेच्या वतीने मा.न्यायालयात जिल्हा परिषदेची बाजु मांडणे कामी वकिलांच्या नियुक्ती बाबतचे कामकाज करणे.इत्यादी  विषय समाविष्ट आहेत.महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभाग नागरीकांची सनद प्रसिध्द करीत आहे या खात्याशी संबधीत असणा-या सेवा तत्परतेने सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक नागरीकांना उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग बांधील आहे.

 

 

२. ग्रामपंचायत  विभागाची रचना

       मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामपंचायत विभागाचे मुख्य असून मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहे.ग्रामपंचायत विभागातील कर्मचा यांकडे एकूण 16 शाखांमधे विषयाची विभागणी करण्यात आली आहे. (सोबत परिशिष्ठ १ जोडले आहे)

 

३. कार्यपूर्तीचे वेळापत्रक

            ग्रामपंचायत विभागामार्फत नागरीकांना प्रत्यक्ष पुरविण्यात येणा-या सेवांच्या कार्यपूतींचे वेळापत्रक परिशिष्ठ १ मधे सादर करणेत आले आहे. महाराष्ट्र शासकिय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमयन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या  विलंबास प्रतिबंध अधिनियम  2005 मधीलप्रकरण 3 च्या कलम 11 मध्ये नमुद केलेल्या न्यायप्रविष्ठ बाबी लोक आयुक्त किवा उप  लोक आयुक्त आणि घटनात्मक संस्था, आयोग, न्यायीक बाबी इत्यादींना कार्यपुर्तीच्या वेळापत्रकातील स्तंभ क्र.4 येथील वेळापत्रकातुन सुट राहील.

 

 4.अ) गा-हाणी/तक्रारी यांचे निराकरण

           कार्यपूर्तीस होणारा विलंब व अन्य काही गा-हाणी असल्यास त्यासंबंधी परिशिष्ठ १ मधील स्तंभ क्र. ५ मध्ये नमूद केलेल्या अधिका-याकडे तक्रार नोंदविता येईल व तक्रार प्राप्त झाल्यानूसार ७ दिवसात त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधीत अधिका-याची राहील.

             यानंतर नागरिकांचे समाधान न झाल्यास संबंधीत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे याबाबत तक्रार करता येईल. गा-हाणे समक्ष भेटीने व पत्राने मांडता येईल.

 

४. ब) जनसामान्यांकडून सूचना

          ही नागरीकांची सनद सर्वसामान्य नागरीकांच्या छानणीसाठी नेहमीच खुली असेल व सन्मानीय नागरीकांच्या बहुमूल्य सूचनांचा गांभिर्यपूर्वक विचार करून त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येतील. ग्रामपंचायत विभागाचे अधिनिस्त येणा-या सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क मांडण्यासाठी सनद नेहमीच सहकार्य करेल.

 

५. नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी

         ग्रामपंचायत विभाग नागरीकांच्या या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटीबध्द आहे. ग्रामपंचायत विभाग आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्य भावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करून देण्याची हमी देत आहे. या सेवा पूरविताना नागरीकांना सौजन्यपुर्ण वागणूक देण्याची विभागातील प्रत्येक अधिकारी/कर्मचा-याची राहील.

 

          महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांचे बदलीचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील प्रकरण क्र. ३ च्या कलम १०(१) मधील तरतूदीस अनुसरून तत्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी अति तातडीच्या स्वरूपाची नस्ती शक्यतो ४ दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबधीत नसलेल्या नस्ती ४५ दिवसाच्या आत व दुस-या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या व त्या विभागाचे अभिप्राय आवश्यक असलेल्या नस्तीवर ३ महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

 

परिशिष्ट १

ग्रामपंचायत विभाग

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक/नासद/2009प्र.क्र./80/09/18 दि.04/08/2009 नुसार  नागरीकांची सनद

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

1

2

3

4

5

1

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे

जन माहिती अधिकारी तथा कनिष्ठ प्रशासन अधिकारी

30 दिवस

अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी (पंचायत)

 

2

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे

अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत

45 दिवस

मा. राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ

 

3

जिल्हा ग्राम विकास विकास निधी अंतर्गत कर्ज मंजुरी प्रकरणे

कनिष्ठ लेखाधिकारी

अर्जप्राप्त झालेपासुन 5 दिवस

अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी (पंचायत)

4

कर्जवितरण वसुली गंतवणुक अशंदान वसुली

कनिष्ठ लेखाधिकारी

1 वर्षाचे आत

अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी (पंचायत)

5

ग्रामपंचायत विभागातील लेखा परिखण मुददयांची पुर्तता

लेखा

90 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

6

ग्रामपंचायत अधिनियम 39(1) ची प्रकरणांवर कार्यवाही करणे

प्रशा-1

अर्ज प्राप्त झालेपासुन 30 दिवसात

मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग नवी मुंबई

7

कलम 40 2 नुसार सतत सहा महिने गैरहजर असणाया सरपंच/उपसरपंच सदस्य यांचेवर कार्यवाही करुन पदावरुन कमी करणे राजीनाम्यावर कार्यवाही करणे.

प्रशा-1

अर्ज प्राप्त झालेपासुन 30 दिवसात                               

मा. अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे

मा. जिल्हाधिकारी ठाणे

 

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

 

1

2

3

4

5

 

8

सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या तक्रारीबाबत कार्यवाही

प्रशा-1

सात दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

9

सासंद आदर्श ग्राम योजना आमदार आदर्श ग्राम योजनांबाबत प्राप्त पत्रव्यवहारावर कार्यवाही

योजना-1

सात दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

10

ग्रामपंचायतत नगरपालिका/नगरपरिषद रुपांतर ग्रापं हदवाढ प्रकरणे

प्रशा-1

सात दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

11

न्यायालयीन प्रकरणांवर कार्यवाही करणे.

संबधित कार्यासन

शिघ्रगतीने

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

12

लोकशाही दिनामध्ये प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे

प्रशा-3

सात दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

13

मा.लोक आयुक्त / उपलोकआयुक्त यांचेकडुन प्राप्त प्रकरणे

प्रशा-3

सात दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

14

सरपंच राजीनामा मंजुरीबाबत कार्यवाही करणे

प्रशा-1

सात दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

15

आपले सरकार सेवा केंद्र assKचे ग्रामपंचायत स्तरावरील केंद्र चालकाचे मोबदला वेतन अदा करणेबाबत

लेखा

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

16

आपले सरकार सेवा केंद्र assKचे बाबत व इतर कार्यवाही

योजना-02

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

17

ग्रामपंचायतीची प्राप्त अपहार प्रकरणांवर कार्यवाही करणे

प्रशा-3अ

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

18

ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षणावर कार्यवाही करणे.

प्रशा-02

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

19

जिल्हा परिषदेकडील स्थानिक निधी/महालेखापाल पंचायत राजसमिती कडील प्रलंबित परिक्षण मुददयावर कार्यवाही करणे.

लेखा

4 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

 

 

 

1

2

3

4

5

20

आकृषिक कर अहवाल संकलन

योजना-02

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

21

शासनाकडुन प्राप्त होणा-या जमीन महसुल अनुदानावर कार्यवाही करणे

योजना-02

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

22

शासनाकडुन प्राप्त होणा-या जकात कर अनुदानावर कार्यवाही करणे

 

योजना-02

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

23

शासनाकडुन प्राप्त होणा-या आदिवासी क्षेत्र अनुदानावर कार्यवाही

करणे

 

पेसा

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

24

शासनाकडुन प्राप्त होणा-या गौण खनिजे अनुदानावर कार्यवाही करणे

योजना-02

 

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

25

शासनाकडुन प्राप्त होणा-या जमिन समानीकरण अनुदानावर कार्यवाही करणे

योजना-02

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

26

शासनाकडुन प्राप्त होणा-या यात्रा कर अनुदानावर कार्यवाही करणे.

योजना-2

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

27

शासनाकडुन प्राप्त होणा-या मागास व आदिवासी क्षेत्र अनुदानावर कार्यवाही करणे

योजना-2

8 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

28

ग्रामपंचायत कृती आराखडा तयार करणे

 

RGSA

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

29

ग्रामपंचायत दप्तर तपासणी कृती आराखडा तयार करणे.

 

प्रशा-3 अ

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

30

ग्रामपंचायत दप्तर तपासणी उदिष्ट व साध्य

प्रशा-3 अ

मासिक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

 

1

2

3

4

5

31

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत  आस्थापना विषयक बाबी

आस्था-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

32

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सेवा जेष्ठता यादया विषयक बाबी

आस्था-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

33

ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी आस्थापना विषयक सर्व बाबी

आस्था 2 अ

7 दिवस व काही 45 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

34

सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्ती नंतरचे लाभ देणे निवृत्ती वेतन प्रकरणे गटविमा प्रकरणे इ.

आस्था 2 अ

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

35

आस्थापना विषयक दरमहाचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे रिक्त पदे अनुशेष पेन्शन

प्रशा-02

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

36

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांची दैनेदिनी मंजुर करणे

आस्था-2

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

37

विस्तार अधिकारी ग्रामपंचायतयांची यांच्या बदली प्रतिनियुक्ती प्रस्तावास मंजुरी देणे

आस्था-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

38

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 4 नुसार 1 ते 17 बाबींचा दरवर्षीची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे

आस्था-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

39

यशवंत पंचायत राज अभियान अंगर्तत विभागातील गुणवंत कर्मचारी यांचे निवडीसाठी कर्मचा-यांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागकडे सादर करणे

आस्था 2अ

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

40

जिल्हा परिषद वर्ग३ कर्मचा-याच्या सेवा विषयक अपिलाबाबत कार्यवाही करणे व त्या अनुषंगाने माहितीच्या अधिकारातील अर्ज व तक्रारी अर्जावर कार्यवाही करणे.

आस्था 2 अ

7 दिवस 45 दिवस तीन महिने

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

 

1

2

3

4

5

 

41

ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणुक करणे

प्रशा-1

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

42

शासन स्तरावरुन प्राप्त सरपंच मानधन सदस्य बैठक भत्ता अनुदान तालुकास्तरावर वितरीत करणे

प्रशा-1

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

43

शासनाकडुन प्राप्त ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन अनुदान तालुका स्तरावर वितरीत करणे

प्रशा-1

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

44

ग्रामपंचायत कर्मचारी आस्थापना विषयक कामकाज

आस्था-2

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

45

10% ग्रामपंचायत कर्मचारी जेष्ठता सुची प्रसिध्द करणे

आस्था-2

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

46

सरपंच/उपसरपंच निवडणुका ग्रामपंचायत निवडणुकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ती | सादर करणे.

प्रशा-1

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

47

जनसुविधा योजनाअंतर्गत नियोजन समिती कडुन मंजुरी मिळालेल्या कामांचा प्रशासकीय मंजुरी देणे व निधी वितरीत करणे

योजना-1

15 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

48

नागरी सुविधा अंतर्गत गट स्तरावरुन प्रस्ताव प्राप्त करुन घेणे छाननी करणे प्राप्त प्रसतावाची यादी जिल्हा नियोजन समिती कडे मंजुरीकरीतासादर करणे.

योजना-1

वार्षिक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

49

नागरी सुविधा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कडुन मंजुरी मिळालेल्या कामांचा प्रशासकीय मंजुरी देणे व निधी वितरीत करणे

योजना-1

15 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

50

कै आर आर (आबा) पाटील सुदंर गाव योजनांची अंमलबजावणी करणे.

प्रशा-2

सहामाही

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

 

1

2

3

4

5

 

51

कोकण पर्यटनाअंतर्गत ग्रामिण क्षेत्राचा विकास करणे 1. प्रकल्प निवड करणे 2. कामांची निवड करणे 3. जिल्हा कार्यकारीणी समितीकडुन कामांची मंजुरी प्राप्त करुन घेणे4. जिल्हा कार्यकारीणी मंजुरी दिलेल्या प्रकल्प राज्य कार्यकारीणीच्या मंजुरीकरीता सादर करणे. राज्य कार्यकारीणी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाचे अंमलबजाणी करणे

योजना-1

वार्षिक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

52

तालुकास्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांची आढावा बैठकीचे आयोजन करणे

प्रशा-2

मासिक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

53

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे आस्थापनाविषयक कामकाज व तक्रारी

आस्था 1-2

7 दिवस 3 दिवस 45 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

54

निलंबन व विभागीय चौकशी

आस्था 1-2

45 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

55

कंत्राटी ग्रामसेवक वेतन

आस्था 1-2

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

56

कंत्राटी ग्रामसेवक नियमित करणे राजीनामे

आस्था 1-2

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

57

ग्रामपंचायत विभागाकडील संवर्ग सरळसेवा पदोन्नती पदभरती

आस्था 1-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

58

आदर्श ग्राम पुरस्कार

आस्था-1

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

59

बिंदुनामावली ग्रामसेवक ग्राविअ संवर्ग

आस्था-1-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

60

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे संवर्ग निहाय

गोपनीय अहवाल

आस्था-1-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

 

1

2

3

4

5

 

61

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे संवर्ग निहाय बदल्या

आस्था-1-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

62

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे संवर्ग निहायसेवा जेष्ठता यादया

आस्था-1-2

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

63

ग्रामपंचायत कर वसुलीबाबत घरपटटी पाणीपटटी दिवाबत्ती आरोग्य व इतर

योजना-2

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

64

करांची फेर आकारणी करणे

 

योजना-2

130 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

65

ग्रामपंचायत विभागाचा वार्षिक प्रशासन अहवाल सामान्य प्रशासन विभागडे सादर करणे

प्रशा-1

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

66

ग्रामपंचायत मागासवर्गीय 15% खर्च, महिला व बाल कल्याण 10% खर्च व दिव्यांग 5% खर्च

योजना-2

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

67

ग्रामसभेचे आयोजनाबबत पंचायत समितींना सुचना देणे

प्रशा-1

शासन आदेशान्वये

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

68

राष्टीय गौरव ग्रामसभा पुरस्काराबाबत कार्यवाही करणे

प्रशा-1

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

69

ठोक अशंदानाबाबत कार्यवाही करणे.

योजना-2

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

70

15 वा वित्त आयोगाचे अनुदान ग्रामपंचायतींना वितरीत करणे

आस्था-1

10 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

71

तिर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत प्रस्तावावर कार्यवाही करणे

योजना-1

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

72

2515 अंतर्गत मा.लोकप्रतिनिधीनी सुचविलेली तसेच शासनाकडुन मंजुरी मिळालेल्या कामाना प्रशासकीय मान्यता देणे व निधी वितरीत करणे.

योजना-1

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

 

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

1

2

3

4

5

73

अल्पसख्यांक समाजासाठी मुलभुत सुविधा पुरविणे संदर्भात परीपुर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे.

योजना-1

15 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

74

कार्यालयीन यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्ती

लेखा

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

75

शासन स्तरावर प्राप्त मुद्रांक शुल्क अनुदान वाटप

करणे

योजना-2

31 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

76

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांची दैनंदिनी संभाव्य फिरती कार्यक्रम सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे

प्रशा-3

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

77

अतिक्रमणे अनाधिकृत बांधकामासंदर्भात प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे

प्रशा-3अ

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

78

भष्टाचार निर्मुलन अंतर्गत जिल्हा समितीकडे प्राप्त अर्जाचे निराकरण करणे

प्रशा-2

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

79

ग्रामपंचायत विभाजनासंदर्भात प्राप्त प्रस्तावावर कार्यवाही करणे

प्रशा-1

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

80

नविन ग्रामपंचायत/गाव स्थापन करणे

प्रशा-1

3 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

81

पुर्नवसित गाव स्थापन करणे

प्रशा-1

32 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

82

आठवडी बाजाराबाबत प्राप्त प्रस्तावावर कार्यवाही

करणे

प्रशा-1

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

83

वाहन दुरुस्ती लॉगबुक पेट्रोल बील नोंदी

प्रशा-2

30 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

84

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अन्वये ग्रामपंचायत स्तरावर सेवा पुरविणे

प्रशा-2

मासिक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

1

2

3

4

5

85

शासनाचे ऑनलाईन तक्रारीबाबत

योजना-1

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

86

योजनांच्या खर्चाचा ताळमेळ

लेखा

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

87

ग्रामपंचायत विभगातील देयकांवर कार्यवाही करणे

लेखा

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

88

वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ

लेखा

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

89

कार्यालयात प्राप्त होणारे टपाल नोंदवुन वाटप करणे

आवक जावक

दररोज

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

90

मा.मंत्री, आमदार, खासदार शासन संदर्भ, विभागीय आयुक्त संदर्भ तारांकित अतारांकित प्रश्न कपात सुचना नोंदवुन वाटप करणे

आवक जावक

दररोज

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

91

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज व अपील अर्ज वाटप करणे

आवक जावक

दररोज

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

92

माहितीचा अधिकार मासिक अहवाल सामान्य परिषद ठाणे यांना सादर करणे.

आवक जावक

दरमहा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

93

कार्यविवरण /प्रकरण नोंदवही एकत्रित गोषवारे काढणे

आवक जावक

दर पंधरवडा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

94

पेसा कायदा 1996 अंमलबजावणी व प्रशिक्षण आयोजित करणे

 

पेसा

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

95

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पेसा गावांना गौण वनोपज करीता एकवेळेचे अर्थसहाय्य देणे.

 

पेसा

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

96

५ टक्के अबंध निधी पेसा गावांना वितरीत करणेबाबत संनिंत्रण व अहवाल सादर करणे

 

पेसा

7 दिवस

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

अक्र

सेवेचा तपशिल

 

सेवा पुरविणार अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुददा

सेवा पुरविण्याची विहित मुदत

 

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

1

2

3

4

5

97

पेसा कायदा 1996 बाबतप्रशिक्षण कार्यक्रम

पेसा

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

98

पेसा गाव निर्मिती बाबत संनियत्रण करणे

पेसा

दररोज

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

99

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी  व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे

आरजीएसए

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

100

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील  सरपंच/सदस्यांचे,अधिकारी व कर्मचारी  प्रशिक्षण आयोजन करणे

आरजीएसए

दरवर्षी

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अंदाजपत्रक

15 वा केंद्रीय वित्त आयोग सन 2020 – 21

 

सन 2020 – 21 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना जिल्हा परिषद स्तरावर 10% निधी बाबत करण्यात आलेले नियोजन खालील  प्रमाणे.

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

जि.प.स्तर रक्कम

मंजूर कामांची संख्या

मंजूर रक्कम प्राप्त व्याजासह

1

अबंधित निधी

पहिला

29.6.2020

2,22,29,000

96 कामे 

रक्कम                  रु. 224.59 लक्ष

2

बंधित निधी

पहिला

27.7.2020

2,22,29,000

67 कामे

रक्कम              रु. 223.43 लक्ष

3

अबंधित निधी

दुसरा

8.02.2021

2,22,29,000

99 कामे

रक्कम                रु. 225.70 लक्ष

4

बंधित निधी

दुसरा

15.4.2021

2,22,29,000

72 कामे

रक्कम             रु. 225.92 लक्ष

 

 

एकूण

8,89,16,000

334 कामे

 

सन 2020 – 21 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना पंचायत समिती  स्तरावर 10% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

पंचायत समिती स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

29.6.2020

2,22,29,000

2

बंधित निधी

पहिला

27.7.2020

2,22,29,000

3

अबंधित निधी

दुसरा

8.02.2021

2,22,29,000

4

बंधित निधी

दुसरा

15.4.2021

2,22,29,000

 

 

एकूण

8,89,16,000

सन 2020 – 21 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना ग्रामपंचायत स्तरावर 80% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

ग्रा.पं. स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

29.6.2020

17,78,29,000

 

2

बंधित निधी

पहिला

27.7.2020

17,78,29,000

 

3

अबंधित निधी

दुसरा

8.02.2021

17,78,29,000

4

बंधित निधी

दुसरा

15.4.2021

17,78,29,000

 

 

एकूण

71,13,16,000

 

15 वा केंद्रीय वित्त आयोग सन 2021 – 22

सन 2021 – 22 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना जिल्हा परिषद स्तरावर 10% निधी बाबत करण्यात आलेले नियोजन खालील  प्रमाणे.

 

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

जि.प.स्तर रक्कम

मंजूर कामांची संख्या

मंजूर रक्कम प्राप्त व्याजासह

1

अबंधित निधी

पहिला

20.5.2021

1,31,44,000

 

64 कामे

133.76 लक्ष

2

बंधित निधी

पहिला

15.09.2021

1,97,16,000

67 कामे

197.16 लक्ष

 

3

अबंधित निधी

दुसरा हप्ता

13.04.2022

1,40,57,159

68 कामे

157.73 लक्ष

4

बंधित निधी

दुसरा हप्ता

12.07.2022

1,90,53,176

71 कामे

209.08 लक्ष

 

 

 

एकूण

6,59,70,335

270 कामे

 

697.73 लक्ष

 

सन 2021– 22 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना पंचायत समिती  स्तरावर 10% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

पंचायत समिती स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

20.5.2021

1,31,44,000

2

बंधित निधी

पहिला

28.10.2021

2,25,14,934

3

अबंधित निधी

दुसरा

13.4.2022

1,40,57,159

4

बंधित निधी

दुसरा

12.07.2022

1,90,53,000

 

 

एकूण

6,87,69,093

 

सन 2021 – 22 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना ग्रामपंचायत स्तरावर 80% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

ग्रा.पं. स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

20.5.2021

10,51,53,000

2

बंधित निधी

पहिला

10.11.2021

18,56,81,481

3

अबंधित निधी

दुसरा

13.04.2022.

12,42,65,601

4

बंधित निधी

दुसरा

12.07.2022

15,70,93,462

 

शासन स्तरावरून सन 2021-22 च्या बंधीत निधीच्या दुसऱ्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या ग्रामपंचायत स्तर निधीचे वितरण

 

07.08.2024

2,88,59,000

 

 

 

एकूण

60,10,52,544

 

 

15 वा केंद्रीय वित्त आयोग सन 2022 – 23

सन 2022 – 23 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना जिल्हा परिषद स्तरावर 10% निधी बाबत करण्यात आलेले नियोजन खालील  प्रमाणे.

 

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

जि.प.स्तर रक्कम

मंजूर कामांची संख्या

 

1

अबंधित निधी

पहिला

10.11.2022

1,56,11,000

 

सन 2022 -23 चा एकूण 103 कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे

 

2

बंधित निधी

पहिला

18.11.2022

2,54,98,000

सन 2022 -23 चा एकूण 119 कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे

 

3

अबंधित निधी

दुसरा

प्रशासक कार्यरत असल्यामुळे शासन स्तरावरून निधी प्राप्त नाही

 

4

बंधित निधी

दुसरा

प्रशासक कार्यरत असल्यामुळे शासन स्तरावरून निधी प्राप्त नाही

 

 

 

एकूण

4,11,09,000/-

 

 

 सन 2022– 23 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना पंचायत समिती  स्तरावर 10% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

पंचायत समिती स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

10.11.2022

1,52,05,000

2

बंधित निधी

पहिला

18.11.2021

2,48,51,000

3

अबंधित निधी

दुसरा

प्रशासक कार्यरत असल्यामुळे शासन स्तरावरून निधी प्राप्त नाही

4

बंधित निधी

दुसरा

प्रशासक कार्यरत असल्यामुळे शासन स्तरावरून निधी प्राप्त नाही

 

 

एकूण

4,00,56,000

सन 2022 – 23 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना ग्रामपंचायत स्तरावर 80% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

ग्रा.पं. स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

10.11.2022

8,24,52,000

2

बंधित निधी

पहिला

18.11.2022

12,36,79,000

3

अबंधित निधी

दुसरा

29.3.2023

11,52,83,000

4

बंधित निधी

दुसरा

06.4.2023

17,29,40,000

5

अबंधित निधी शासनाकडून रोखुन ठेवलेला निधी वितरीत

 

13.12.2023

4,42,69,000

 

6

बंधित निधी शासनाकडून रोखुन ठेवलेला निधी वितरीत

 

13.12.2023

6,63,80,000

 

 

 

एकूण

60,50,03,000/-

 

15 वा केंद्रीय वित्त आयोग सन 2023 – 24

 

सन 2023 – 24 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना जिल्हा परिषद स्तरावर 10% निधी बाबत करण्यात आलेले नियोजन खालील  प्रमाणे.

 

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

जि.प.स्तर रक्कम

मंजूर कामांची संख्या

 

1

प्रशासक कालावधी असल्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त नाही.

 

2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 सन 2023– 24 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना पंचायत समिती  स्तरावर 10% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

पंचायत समिती स्तर वितरीत रक्कम

1

प्रशासक कालावधी असल्यामुळे शासनाकडून  निधी प्राप्त नाही.

2

 

 

 

 

 

 

 

 

 

सन 2023 – 24 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना ग्रामपंचायत स्तरावर 80% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

ग्रा.पं. स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

13.12.2023

11,28,79,000

 

2

बंधित निधी

पहिला

03.10.2023

16,93,16,000

 

3

अबंधित निधी

दुसरा

04.03.2024

12,67,62,000

 

4

बंधित निधी

दुसरा

13.03.2024

19,01,44,000

 

 

 

एकूण

59,91,01,000

 

 

 

15 वा केंद्रीय वित्त आयोग सन 2024 – 25

 

सन 2024 – 25 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना जिल्हा परिषद स्तरावर 10% निधी बाबत करण्यात आलेले नियोजन खालील  प्रमाणे.

 

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

जि.प.स्तर रक्कम

मंजूर कामांची संख्या

 

1

प्रशासक कालावधी असल्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त नाही.

 

2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 सन 2024– 25 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना पंचायत समिती  स्तरावर 10% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

पंचायत समिती स्तर वितरीत रक्कम

1

प्रशासक कालावधी असल्यामुळे शासनाकडून  निधी प्राप्त नाही.

2

 

 

 

 

 

 

 

 

 

सन 2024 – 25 मध्ये जिल्हा परिषद ठाणे यांना ग्रामपंचायत स्तरावर 80% वितरीत निधी माहिती

अ.क्र.

निधी प्रकार

हप्ता क्र.

शासन निर्णय दिनांक

ग्रा.पं. स्तर वितरीत रक्कम

1

अबंधित निधी

पहिला

07.08.2024

11,29,42,000

 

2

बंधित निधी

पहिला

06.09.2024

16,93,27,000

 

 

 

एकूण

28,22,69,000

 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

यशोगाथा

73 व्या घटनादरुस्तीने पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करुन दिला म्हणजे केद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्रमाणेच पंचायत राजलाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. यामुळे सर्व राज्यात जिल्हा तालुका व ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायतराज पध्दती सुरु झाली .

ठाणे जिल्हयात 431 ग्रामपंचायती असून त्यामुध्ये प्रामुख्याने विकास कामांचे आराखडे, विविध योजनांच्या लाभार्थीची निवड व इतर अनुषंगीक कामे पार पाडली जातात.

तसेच विविध योजनामध्ये  15 वा वित्त आयोग, कोकण पर्यटन विकास, पेसा गाव राबविण्यांत येवून ग्रामपंचायती बळकटीकरण होण्यासाठी उत्पन्नाचा भाग म्हणून जमिन महसूल, जमीन समानीकरण, मुद्रांक शुल्क, यात्राकर, जकात कर, मागासवर्गीय अनुदान, गौण खनिज इत्यादीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.

 

छायाचित्र दालन