महिला व बालकल्याण विभाग

प्रस्तावना

महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 8 एकात्मिक बाल विकास सेवा योजना  प्रकल्प कार्यान्वीत आहेत.  जिल्हयामध्ये शहापुर, डोळखांब हे प्रकल्प पुर्णत: आदिवासी क्षेत्रात येत असून, भिवंडी -1, भिवंडी -2, मुरबाड-1, मुरबाड-2 हे अंशत: आदिवासी  प्रकल्प असून, अंबरनाथ कल्याण हे प्रकल्प  ग्रामीण क्षेत्रात येत आहेत.जिल्हयात 1351  मुळ अंगणवाडी केंद्र  व 295 मिनी अंगणवाडी असे एकूण 1646 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. जिल्हयात एकूण अंगणवाडी बीट ची संख्या 54 आहे.

विभागाची संरचना

संपर्क

.क्र.

प्रकल्प

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे नाव

भ्रमणध्वनी क्रमांक

Email ID

1

मुख्यालय

25369122

श्री. संजय सी. बागुल

9967282382

cwdzp169.thane@gmail.com

2

ठाणे

022 - 25382560

श्रीम. धनश्री मो. साळुंखे

8888497710

cdpothane@gmail.com

3

कल्याण

0251 - 2311400

श्रीम. अर्चना पवार

9975378991

cdpokalyan@gmail.com

4

अंबरनाथ

0251 - 2680863

श्रीम. अर्चना पवार (अतिरिक्त चार्ज

9975378991

cdpoambernath@gmail.com

5

मुरबाड - 1

02524 - 223632

श्रीम. ज्योती एस. लंगुटे

8668945813

icdsmurbad12@gmail.com

6

मुरबाड -2

02524 -

श्रीम. कल्पना देशमुख

8530685021

cdpomurbad2@gmail.com

7

शहापुर

02527 - 273787

श्री. सतीश पोळ(अतिरिक्त चार्ज)

7387778736

shahapuricds1@gmail.com

8

डोळखांब

02527 - 234307

श्री. सतीश पोळ (अतिरिक्त चार्ज)

7387778736

icdsdolkhamb@rediffmail.com

9

भिवंडी -1

02522-253676

श्रीम. वैशाली दाभाडे

8425847772

cdpobhiwandi1@gmail.com

10

भिवंडी -2

 

श्रीम. वैशाली दाभाडे

8425847772

cdpobhiwandi@gmail.com

 

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ६.१५

( दुपारी ०१.०० ते २.०० या वेळेत अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी.)

सर्व शनिवार रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून.

विभागाचे ध्येय

महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे

विभागाचे ध्येय

 

1. बालकांच्या योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे.

2. सहा वर्षाखालील वयाच्या बालकांना पोषण व आरोग्य स्थितीतमध्ये सुधारणा घडवून आणणे.

3. मृत्यु, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणा-या बालकांच्या संख्येत घट घडवून आणणे.

4. बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे.

5. योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व  पोषणयुक्त आवश्यकते बाबत काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनविणे.

 

 

माहितीचा अधिकार

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.क्र.

अधिकारी व कर्मचारी यांचे नाव

पदनाम

मुळ वेतन

NPS

महागाई भत्ता

घरभाडे भत्ता

स्थानिक पूरक भत्ता

वाहतुक भत्ता

धुलाई भत्ता

एकूण

1

श्री. संजय सी. बागुल

जिल्हा कार्यक्रम अधिकारी

93600

0

44436

26082

300

5400

0

172818

2

श्री. नितीन के. सोष्टे

सहाय्यक प्रशासन अधिकारी

62100

0

28566

16767

300

2700

0

110433

3

श्री. अनिल पी. कांबळे

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

43600

0

20056

11772

300

2700

0

78428

4

श्री. विकास आर. वेखंडे

विस्तार अधिकारी (सां)

51500

10527

23690

13905

300

2700

0

102622

5

श्री. सुनिल  बी. बांबळे

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

50500

0

23230

13635

300

5400

0

93065

6

श्रीम. सुवर्णा व्हि. बनगर

वरिष्ठ सहाय्यक

33300

6807

15318

8991

300

2700

0

67416

7

श्रीम. पुजा पी. मारकू

कनिष्ठ सहाय्यक

32000

6541

14720

8640

200

2700

0

64801

8

रिक्त

कनिष्ठ सहाय्यक

0

0

0

0

0

0

0

0

9

रिक्त

वाहनचालक

0

0

0

0

0

0

0

0

10

श्री. व्ही. एस. आगवणे

हवालदार

37500

0

17250

10125

300

2700

50

67925

11

श्रीम. सिमा के. तांबे

शिपाई

25000

5110

11500

6750

200

2700

50

51310

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र. पदनाम  कर्तव्य कार्यालयीन आदेश 
1 3 4 5
1 सहा. प्रशासन अधिकारी  1.      कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे . जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2.      जन माहिती अधिकार म्हणून कामकाज पाहणे 
3.      आस्थापनाविषयक कामकाज / योजना विषयक आणि लेखा विषयक कामकाज पाहणे 
4.    सर्व कार्यासनांचे पर्यवेक्षण करणे. 
5.     वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे 
2 कनिष्ठ प्रशासन अधिकारी  1.      कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2.      आस्थापना विषयक कामकाज / योजना विषयक कामकाज पाहणे.
3.      सर्व कार्यासनाचे पर्यवेक्षण करणे 
4.    वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे 
3 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) नियोजन  1.      मासिक प्रगती अहवाल संकलण व ऑनलाईन रिपोटींग संबंधि सर्व बाबी  जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2.      अंगणवाडी बांधकामे व दुरूस्ती, नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे 
3.      कुपोषण निमुर्लन  कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
4.    पूरक पोषण आहार डॉ. ए. पि. जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना.
5.     बाल कामगार सभा, इतर सर्व सभांची ‍टिपणी व माहिती संकलीत करून देणे, ग्राम बाल विकास केंद्र, व्ही. सी. डी. सी. इत्यादी कामकाज पाहणे
6.     नवसंजिवनी व इतर सभांचे कामकाज पाहणे.
7.     आपले सरकार पोर्टलबाबत कामकाज पाहणे (ऑनलाईन) 
8.     राजमाता जिजाऊ मिशनबाबत कामकाज.
9.      बेटी बचाओ बेटी पढाआ, माझी कन्या भाग्यश्री, लेक लाडकी  योजने संबंधी कामकाज पाहणे. 
    संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित न्यायालयीण प्रकरणे, माहिती अधिकार,पंचायत राज अभियान, वार्षिक प्रशासन अहवाल, अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग,  इमाव समिती, महिला हक्क व कल्याण समिती, स्थानिक निधी, महालेखाकार, पं.रा.स. विभागीय आयुक्त तपासणी मुददे,  वेळोवेळी बैठकांना माहिती  पुरविणे, विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे   
4 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 1.विभागाशी संबंधित सर्व आर्थिक विषयक कामकाज, सर्व लेखा शिर्षनिहाय नियतव्यय / तरतुद मागणी, जमाखर्च  अभिलेख ठेवुन त्यासंबंधाने कामकाज करणे. जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2. जिल्हा परिषद सेस योजना व सर्वसाधारण योजना DPDC  योजनांचे आर्थिक कामकाज पाहणे
3. मुख्यालय व प्रकल्पस्तरावरील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची सेवार्थ विषयक वेतन देयकांबाबत बीडीएस काढणे कोषागारामध्ये देयक सादर करणे इ. बाबी आस्था-2 कार्यासनाकडून आपले नियंत्रणाखाली करून घेणे जिल्हा व प्रकल्प स्तरावरील वेतन, मानधन देयक यावर नियंत्रण ठेवणे व प्रकल्पांचा ताळमेळ घेणे. 
4.सर्व प्रकारचे लेखा परिक्षण मुद्यांची पुर्तता करणे, 
5.अंगणवाडी कार्यकर्ती / मदतनीस यांचे वाढीव मानधन, उपचार शास्त्रभूत आहार, बचत गट निधी मागणी व वाटप, परिवर्तनीय निधी, भाऊबीज भेट इत्यादी. विभागांतर्गत  राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद योजनांचे आर्थिक कामकाज पाहणे.
6. पी.आर.सी /स्थानिक निधी / महालेखाकार / पंचायत राज लेखा परीक्षण मुद्यांची पुर्तता करणे
7. महालेखाकार कार्यालयाशी ताळमेळ घेणे, उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.
    संकिर्ण पत्रव्यवहार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज ,कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार,पंचायत राज अभियान, वार्षिक प्रशासन अहवाल, अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग अनु. जमाती, अनुसूचित जाती प्रशासन अहवाल, स्थानिक निधी,  महिला हक्क व कल्याण समिती,इमाव समिती,  महालेखाकार, विभागीय आयुक्त तपासणी मुददे अनुदान निर्धारण कॅशबुक वेळोवेळी बैठकांना माहिती पुरविणे, विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे   
5 वरिष्ठ सहाय्यक  1.विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद योजनांचे व शासकीय योजना DPDC या योजनांचे भौतिक कामकाज पाहणे.  जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2.महिला समुपदेशन / सल्लागार केंद्रासंबंधी सर्व कामकाज, समुपदेशन केंद्र मंजुरी / मानधन तरतुदी वाटप /
3.नागरीकांची सनद तयार करून प्रसिदध करणे
4.वार्षिक प्रशासन अहवाल एकत्रीकरण 
5 माहितीचा अधिकार 1 ते 17 बाबी प्रसिध्द करणे.
6.महिला व बाल कल्याण समिती सभांचे कामकाज पाहणे. 
7.विभागांतर्गत होणाऱ्या बैठकीचे इतिवृत्त लिहिणे व वितरीत करणे.
8. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेचे कामकाज पाहणे .
9. महिला लैगिंक छळ समितीबाबतचे कौटुबिक हिंसाचार, हुंडाबळी, बाल विवाह, कामकाज पाहणे.
10.विभागांतर्गत  राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद  योजनांचे निधिी वितरण आदेश काढणे . 
 
    संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरण,माहिती अधिकार, कामकाज पाहणे. पंचायत राज , अनुसूचित जाती, जमाती समिती, वार्षिक प्रशासन अहवाल, इमाव समिती, विशेष मागास प्रवर्ग, महालेखाकार, स्थानिक निधी, व विभागीय आयुक्त तपासणी मुददे,विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.  
6 कनिष्ठ सहाय्यक        आस्था -1  1.जिल्हयातील सर्व बाल विकास अधिकारी, /कार्यालयीन कर्मचारी/ सहाय्यक बाल विकास अधिकारी, /मुख्यसेविका, यांच्या आस्थापना विषयक बाबी हाताळणे.  जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2.नियुक्ती, भरती, बदल्या कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना/ विभागीय चौकशी, निलबन अनधिकृत गैरहजेरी, रजा प्रकरणे, गटविमा, भ.नि.नि. प्रकरणे, से
नि.वे./ कु.नि.वे.प्रकरणे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे, जेष्ठता सूची तयार करणे, बिंदु नामावली अद्यासत करणे समायोजन प्रस्ताव, अनुकंप प्रकरणे, गोपनीय अहवाल, इ. न्यायालयीन प्रकरणे, माहितीचा अधिकार,  वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी अहवाल सादर करणे
3.बाल विकास प्रकल्प अधिकारी/ सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी/ मुख्यसेविका यांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण
4.पंचायत राज प्रश्नावली/ अनु.जाती /जमाती व इतर मागासवर्गीय  समितीने विशेष मागास प्रवर्ग समिती महिला हक्क व कल्याण समिती इ. समित्यांनी मागविलेली माहिती एकत्रित करून सादर करणे.
5. न्यायालयीन प्रकरणाचा एकत्रित अहवाल तयार करणे 
6.मा. विभागीय आयुक्त तपासणी माहितीचे संकलन करून मुद्ये पूर्तता करणे तपासणीचे वळी एकत्रिकरण करून माहिती सादर करणे.
7. वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली इतर कामे करणे  
 
    संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहणे. वेळोवेळी येणाऱ्य विविध समित्यांना उदा. पीआरसी, अनु. जमाती कल्याण समिती,  अनु जाती कल्याण समिती इ.मा.व. समिती, महिला हक्क कल्याण समिती इ. माहिती तयार करणे संकलित करणे इ. विधानसभा / विधान परिषद तारांकीत, अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे  
7 कनिष्ठ सहाय्यक आस्था -2  1आवक जावक नोंदविणे ई प्रणाली मध्ये टपाल नोंदविणे मा. विभागीय आयुक्त यांना तपासणी वेळी माहिती पुरविणे माहिती अधिकार, मासिक अहवाल व माहिती अधिकार  ऑनलाईन तक्रारीचा निपटारा करणेबाबत कामकाज पाहणे.  जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021
2. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, / बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी मंजुरीबाबत कामकाज पाहणे
3. प्रकल्पस्तरावरी कर्मचारी यांचे दप्तर तपासणी बाबत कामकाज पाहणे
4.स्टेशनरीची देखरेख करणे / वितरीत करणे
5.लेखा शाखेच्या नियंत्रणाखाली सेवार्थमध्ये अधिकारी व कर्मचारी  तसेच सर्व प्रकल्पाची देयके एकत्रित करून एमटीआर काढून व अधिकारी यांची वेतन बिले तयार करून अर्थ विभागास सादर करणे 
6.वाहनाची देखभाल दुरूस्ती संबंधि कामे.
7. अभिलेखाचे कामकाज पाहणे विभागातील सर्व कार्यासनांचे अभिलेख एकत्रित करून मध्यवर्ती अभिलेख कक्षात पाठविणे
8.पीएफएमएस बाबत कामकाज पाहणे.
9.अंगणवाडी कार्यकर्ती / सेविका /मदतनीस आस्थापना विषयक व प्रशिक्षण विषयक सर्व बाबी.
10. ISO / यशवंत पंचायत राज अभियान एकत्रिकरण.
11. 0 ते 6 वयोगटातील मुलांचे आधारकार्ड नोंदणीबाबतचे कामकाज पाहणे.
 
    संकिर्ण पत्रव्यवहार कार्यासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे, माहिती अधिकार, पंचायत राज अभियान, वार्षिक प्रशासन अहवाल, अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इमाव समिती, महिला हक्क व कल्याण समिती, स्थानिक निधी, महालेखाकार, पं.रा.स. विभागीय आयुक्त तपासणी मुद्ये वेळोवेळी बैठकांना माहिती पुरविणे विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.  

 

विभागांतर्गत विविध समित्या

विभागांतर्गत विविध समित्या

महिला व   बालकल्याण विभाग,जिल्हा परिषद,ठाणे

1.सेवा  उदीष्टे

सेवा

1.पूरक पोषण आहार

2.लसीकरण

3.आरोग्य तपासणी

4.संदर्भ सेवा

5.आरोग्य व सकस आहार विषयक शिक्षण

6.अनौपचारीक  पूर्व प्राथमिक शिक्षण

उदीष्टे

  1. ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार दर्जा सुधारणे.

2.मुलांच्या मानसिक,शारीरीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.

3.बालमृत्यू ,मुलांचा रोगटपणा ,कुपोषण ,गळतीचे प्रमाण कमी करणे.

4.स्तनदा मातांना पुरक पोषण आहार आणि आरोग्य विषयक शिक्षण देऊन जागृती निर्माण करणे.

5.विविध खात्यांमध्ये धोरण व अंमलबजावणी बाबत समन्वय घडविणे.

2.आढावा समित्या

1.टास्क फोर्स-गठीत करण्यांबाबत------

   कुपोषणाची कारणे शोधुन उपाययोजना संदर्भात

 शासन निर्णय क्रमांक एबावि 2008/ प्र.क्र.74 / का-5 दिनांक 4 मे ,2009 अन्वये कुपोषणाची कारणे शोधुन त्यावर उपाययोजना करण्याकरीता युध्द पातळीवर कुपोषण निर्मुलनाचा कार्यक्रम सुरू करण्याबाबतची पार्श्वभुमी व कार्यवाही करण्याच्यादृष्टीने ,कुपोषणाची मुळ कारणे शोधुन त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेऊन ,त्याव्यतिरीक्त ठोस उपाययेजना करण्ंयासाठी व कुपोषण व बालमृत्यू निर्मुलनाच्या अनुषंगाने कालबध्द कार्यक्रम आखून उपाययेजना सूचविण्यासाठी व सनिंयत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर कृती दल (Task Force ) समिती गठीत करणेंत आलेली आहे.व सदरची सभा महिन्यातून एकदा घ्यावयाची आहे.

योजना

1.भारतरत्न  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतंर्गत  अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा सव मातांना एक वेळ चौरस आहार  देणे व 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील अंडी/केळी ॠतुमानानुसार  फळे देणे.

                   अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (Calories) व प्रथिनाच्या (Proteins) कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे.आदविासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात,असे अनके संशोधन अभ्यासावरून सिध्द झाले आहे.या पार्श्वभूमिच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व  गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणे  6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील अंडी/केळी ॠतुमानानुसार  फळे देणे.देण्याची योजना सुरू करणेंत आलेली आहे.

2."बेटी बचाओ बेटी पढाओ"

                 "बेटी बचाओ बेटी पढाओ"हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून यापुर्वी काही ठराविक जिल्हयात राबवणेंत येत होती.हा कार्यक्रम महिला व बाल विकास विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग आणिी मानव संसाधन विभाग यांच्या संयुक्त विधमाने राबविण्यात येत आहे.

                 "बेटी बचाओ बेटी पढाओ"हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम राज्यातीलल सर्वच जिल्हयात राबविणेबाबत आदेश असल्यामुळे सदयस्थितीत ठाणे जिल्हयातही राबविणेंत येत आहे.

योजनेची उदिष्टे-

1.लिंग निवडीस प्रतिबंध करणे.

2.मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे.

3.मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबददल खात्री देणे.

 

3.पोषण अभियान

                  महाराष्ट्र राज्यात " पोषण अभियान "हा कार्य्रकम सुरू करण्यात आलेला आहे.सन 2018-2019 या वर्षात अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 30 जिल्हयात करण्यात येत आहे.त्या 30 जिल्हयात ठाणे जिल्हयाचा देखील समावेश आहे.या अभियानातंर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमधील खुजे किंवा बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे,बालकांमधील कुपोषण ,रक्तक्षय,जन्मत:, कमी वजनाचे बालकांचे प्रमाण तसेच 15 ते 49 वयोगटातील किशारेवयीन मुली व जन्मानंतरचे पहिले 1000 दिवस यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.पोषण अभियानातील उदिष्टे व इष्टांक साध्य करण्यासाठी " अभिसरण कृति आराखडा" या घटकांचा अत्यंत महत्वाचे साधन म्हणून पोषण अभियान या कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.या अभियानांतर्गत प्रभावी सेवा देण्याची हमी देण्याकरिता विविध विभागातंर्गत काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये फलनिष्पती होणे समन्वय असणे आवश्यक आहे.त्यानुसार खालील बाबींवर अभियान राबविणेंत येत आहे. 

  1.अंगणवाडी केंद्राचे बळकटीकरण करणे,

  2.पुरक पोषण आहाराच्या गुणवत्तेची खात्री.

  3.प्रभावी आरोग्य सेवा.

  4.पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण ,माहिती शिक्षण आणि संप्रेषण या विषयाचे बळकटीकरण करणे.

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

  1. विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

    1. शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे

          योजनेची कार्यपद्धती व निकष – 

     

    1. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळेपासून जास्त अंतरावरील तथापी शाळा  ते घराचे अंतर कमीत कमी 2 कि.मी. असणाऱ्या मुलींना प्रथम लाभ देता येईल.
    2. इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सदरचा लाभ देय असून एकाच कुटुंबातील तथापि भिन्न ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलीच्या बाबतीत एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 लाभार्थ्यांना लाभ देता येईल.
    3.  शिक्षणासाठी रेल्वे / बसने परगावी जाणा-या विद्यार्थिनींसाठी रेल्वे स्थानक / बसस्थानक ते घर यामधील अंतर कमीत कमी 2 कि.मी. असल्यास व  इतर अटी  पूर्ण होत असल्यास योजना लाभ देय राहील.
    4. क्र.1 व 3 प्रमाणे लाभार्थी संपल्यानंतर 1 कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थींनींना लाभ देता येईल.
    5. सर्वसाधारण लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल परंतू लाभ देतांना  अपंग व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील  विद्यार्थीनींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.
    6. सदरची योजना थेट लाभ हस्तांतरण (DBT) तत्वावर राबविण्यात येईल.
    7. लाभार्थ्यांचे अर्ज बाविप्रअ/गविअ/मा.सभापती पं.स.यांचे शिफारशीनुसार स्विकारले जातील.
    8. लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचे अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहतील.
    9. सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा अन्य विभागाकडुन लाभ घेतला नसल्याची खात्री बाल विकास प्रकल्प अधिकारी करतील.
    10. दोन चाकी सायकलचा लाभ नियोजन विभागाचे शासन निर्णय क्र.डीसीटी/2316/प्र.क्र. 133/का.1417 दि.5 डिसेंबर 2016 अन्वये विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरुपाने मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट-अ मध्ये सायकल या वस्तुचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या विभागाने मंजूर केलेल्या वर्णनानुसार लाभार्थीनींने स्वत: सायकल खरेदी केल्याची शहानिशा प्रकल्पस्तरावर करण्यात येईल. 

    आवश्यक कागदपत्रांच्या प्रती :

    1) विहित नमुन्यातील परिपूर्ण स्वरुपातील अर्ज

    2)जातीचे प्रमाणपत्र ( असल्यास )

    3) वयाचा दाखला ( जन्मदाखला सत्यप्रत, शाळेचे / कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र

    4)आधारकार्डाची सत्यप्रत

    5)दारिद्रय रेषेचा दाखला ( असल्यास  प्राधान्य )

    6)बँक खातेपुस्तिकेच्या प्रथम पानाची सत्यप्रत

    7)सदर योजनेचा लाभ अन्य विभागाकडून यापुर्वी घेतला नसल्याचे सरपंच ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र

    2. विशेष प्राविण्य मिळविणा-या मुलींचा सत्कार-

    1. सदरच्या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील 18 वर्षांच्या आतील मुलां- मुलींना तसेच इयता 10 वी व 12वी नंतरच्या मुलां- मुलींना उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत देता येईल. 
    2. ज्या मुलां-मुलींनी क्रिडा, कला, शिक्षण क्षेत्रात, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य  

    मिळविलेले आहे. अशाच  मुला-मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.

    1.  क्रीडा कला शिक्षण क्षेत्रातील प्राविण्य मिळविलेल्या मुलां मुलींच्या  प्रस्तावांवर शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या शिफारशीसह अर्ज सभापती, गविअ व बाविप्रअ   यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर मागविणेत येतील.
    2.  प्राप्त प्रस्तावातून महिला व बाल कल्याण समिती पुरस्कारासाठी लाभार्थींनींची निवड                                                      करेल.
    3.  पुरस्काराची रक्कम रु. 20,000/- (अक्षरी र.रु. वीस हजार मात्र) एवढी देण्यात येईल.
    4.  सदर रक्कम लाभार्थीनींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
    5. सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

     

    आवश्यक कागदपत्रांच्या प्रती :

     1. विहित नमुन्यातील परिपूर्ण स्वरुपातील अर्ज  

    2. कला, क्रीडा शिक्षण क्षेत्रात स्पर्धांमध्ये राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय /राज्यस्तरावर प्राविण्य मिळालेल्या  दि.--------       

         ते  दि. ------------------------ या कालावधीतील  प्रमाणपत्राची  स्वप्रमाणित प्रत / सत्यप्रत

     3.  वयाचा दाखला ( जन्मदाखला सत्यप्रत, शाळेचे / कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र

     4.  बॅक खातेपुस्तिका सत्यप्रत.

     5. दारिद्रय रेषेचा / वार्षिक उत्पन्नाचा दाखला ( रु. 1,20,000/- पर्यंतचे वार्षिक उत्पन्न ) असल्यास त्याची सत्यप्रत

     6.  आधार कार्ड सत्यप्रत             

    1. स्पर्धा प्रायोजक/  क्रीडा संघटना शासन मान्य असल्याबाबत संबंधितांचे प्रमाणपत्र ( असल्यास )
    2.  

    3.महिलांना साहित्य पुरविणे

     घरघंटी / पिको फॉल / शिलाई मशिन  इत्यादी साहित्य खरेदी केल्यावर प्रतिपूर्ती मिळविण्याबाबत.

     योजनेची कार्यपध्दती

    1. ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
    2.  सदर योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी जास्तीत जास्त रु. 30,000/- पर्यंत खर्च करण्यात येईल व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 10% लाभार्थी हिस्सा वजा जाता उर्वरित रक्कम देय राहील. तसेच एका लाभार्थ्यास एकदाच लाभ देय राहिल व त्याबाबत बाल विकास प्रकल्प  अधिकारी खात्री करतील.
    3.  एका वर्षात कुटुंबातील एकाच पात्र व्यक्तीस लाभ देणेत येईल.
    4. लाभार्थीचे अर्ज बाविप्रअ/गविअ/मा.सभापती पं.स. यांचे शिफारशीनुसार स्विकारले जातील.
    5.  लाभार्थ्यांची अंतीम निवड करण्याचे अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहतील.
    6. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी न सापडल्यास रु. 1,20,000/- पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अन्य महिलांना लाभ देण्यात येईल.
    7. अपंग लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिल जाईल.
    8. सदर योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना देय राहणार नाही.
    9. या योजनेचे लाभ नियोजन विभागाचे शासन निर्णय क्र.डीसीटी/2316/प्र.क्र. 133/का.1417 दि.5 डिसेंबर 2016 अन्वये विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरुपाने मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट-अ मध्ये ज्या वस्तुचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार या विभागाने मंजूर केलेल्या वर्णनानुसार लाभार्थीनींने स्वत: वस्तू खरेदी केल्याची शहानिशा प्रकल्पस्तरावर करण्यात येईल. सदर तरतुदीमधून पात्र लाभार्थीनीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये योजनेंतर्गत येणाऱ्या वस्तूची रोख रक्कम गट विकास अधिकारी यांचेमार्फत जमा करण्यात येईल. तसेच उक्त शासन निर्णयातील परिशष्ट – अ मध्ये (DBT) समाविष्ठ नसलेल्या वस्तू विहित पद्धतीने खरेदी करुन पात्र अर्जदार लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल.
    10. सदर योजना DBT मध्ये समाविष्ट आहे. लाभार्थ्यास आवश्यकतेनुसार पाहिजे ती वस्तू खरेदी करणेचे स्वातंत्र्य राहील तथापि देय होणारे अर्थसहाय्य हे वस्तू खरेदीची प्रत्यक्ष किमतीच्या 90% रक्कम अथवा रु.30,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढेच अर्थसहाय्य अनुज्ञेय असेल व याची खात्री बाल विकास प्रकल्प अधिकारी, यांनी करुनच अर्थसहाय्य वितरीत करावे.

    आवश्यक कागदपत्रांच्या प्रती :

     1. विहित नमुन्यातील परिपूर्ण स्वरुपातील अर्ज(लाभार्थ्यांच्या मोबाईल नंबर सह )

    2. आधार कार्ड सत्यप्रत

    3. बँक खातेपुस्तिका सत्यप्रत

    4. जातीचे प्रमाणपत्र असल्यास

    5.चालु आर्थिक वर्षातील  विद्युत देयक/ देयकाची सत्यप्रत 

     6.अर्जदार महिला विवाहीत / नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला,गॅझेटची सत्यप्रत इ.ची सत्यप्रत

     7. रेशनकार्डची सत्यप्रत.

     8. दारिद्रय रेषेचा दाखला / वार्षिक उत्पन्न 1,20,000/- च्या आती ल असल्याचा दाखल्याची सत्यप्रत.

    9. शिलाई मशिन / पिको फॉल मशिन खरेदीकरीता शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण पुरवठादारामार्फत (Vocational Training Provider) अथवा   इतर शासन मान्य संस्थामार्फत शिवणकाम/फॅशन डिझायनींगचे   प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र .याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी संस्था शासन मान्य असल्याचे प्रमाणित करावे.

    10. सदर योजनेचा लाभ अन्य विभागाकडून यापुर्वी घेतला नसल्याचे सरपंच / ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र

     11. सदर योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका / मदतनीस यांना अनुज्ञेय नसल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची  प्रमाणपत्र

    4) इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे.

     

    योजनेची कार्यपद्धती   :

    1. सदर योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांतील दारिद्रय रेषेखालील व अपंग    तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- पर्यंत असलेल्या कुटुंबातील मुलींना प्राधान्याने देणेत येईल व निधी उपलब्धतेनुसार इतर लाभार्थ्यांना देण्यात येईल.
    2. इ.7 वी ते इ.12 वी पास मुलींना MS-CIT / TALLY / संगणक टायपिंग व समकक्ष संगणक प्रशिक्षण देणेत येईल.
    3. प्रशिक्षण घेण्यासाठी लाभार्थींना दोन पर्याय उपलब्ध रहातील.
    1. मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण घेतले असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करणे. 
    2. प्रशिक्षणासंदर्भात संस्था नेमण्यात आल्यास सदर संस्थेमार्फत प्रशिक्षण घेणे.
    1. 1 जानेवारी 2023  ते 31 मार्च 2024 या कालावधीत संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या मुलींना लाभ

    देण्यात येईल.

    1. संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार संगणक प्रशिक्षणाचे शुल्क थेट लाभ हस्तांतरण (DBT) नुसार आधार संलग्न बँक खात्यावर जमा  करण्यात येईल.
    2. लाभार्थींचे अर्ज बाविप्रअ/गविअ/मा.सभापती पं.स. यांचे शिफारशीनुसार स्विकारले जातील.
    3. लाभार्थींची अंतिम निवड करण्याचे अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहतील.
    4. इच्छुक संस्थांसोबत करार करुन योजना राबविता येईल व प्रशिक्षणाची रक्कम लाभार्थ्यांच्या  खात्यावर वर्ग करण्यात येईल.
    5.  सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा अन्य विभागाकडून लाभ घेतला नसल्याची खात्री बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी करावी.
    6.  सन 2023-2024 या आर्थिक वर्षामधील ज्या पात्र  लाभार्थ्यांना लाभ देता आला नाही. त्यांना  लाभ देय राहील.

    आवश्यक कागदपत्रांच्या प्रती :

    अ) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी पास / बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत

    ब) एमएस-सीआयटी /CCC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची सत्यप्रत

    क) बॅक पास बुकाची सत्यप्रत

    ड) जात प्रमाणपत्र सत्यप्रत असल्यास

    इ) आधारकार्ड सत्यप्रत

    ई) फी भरल्याच्या पावतीची सत्यप्रत

     यापुर्वी या योजनेतून कुटुंबातील कुणालाही या योजने अंतर्गत लाभ मिळालेला आहे / नाही : --------------------------

     5)  आदर्श मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस पुरस्कार.

    योजनेची कार्यपध्दती  : -        

    1. सन 2023-2024 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या प्रती प्रकल्प  उत्कृष्ट 01 अंगणवाडी सेविका,1 मदतनीस, तसेच  01 आशा वर्कर, मानधनी महिला कर्मचारी यांची विहीत नमुन्यातील विवरण पत्राप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी शिफारशीसह सर्व माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचेकडे गोपनिय पाठवतील व गुणानुक्रमाने प्रथम असणाऱ्या प्रकल्पनिहाय एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीस यास व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निवड करून दिलेली प्रकल्पनिहाय एक आशा वर्कर यांना रक्कम रुपये 10,000/- पर्यंत रक्कम बँक खात्यात/धनादेशाद्वारे जमा करण्यात येईल. तसेच त्यांचा सत्कार,पुष्पगुच्छ, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात येईल.
    2. सन 2023-2024 या आर्थिक  वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या प्रती प्रकल्प  एक पर्यवेक्षिका यांची विहीत नमुन्यातील विवरण पत्राप्रमाणे (निकषाप्रमाणे) बाल विकास प्रकल्प अधिकारी,  यांचे शिफारशीसह सर्व माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचेकडे गोपनिय पाठवतील  व यामधुन गुणानुक्रमाने जिल्हयातुन 2 उत्कृष्ट पर्यवेक्षिका यांची निवड करणेत येऊन, त्यांना रक्कम रू. 10,000/- पर्यत रक्कम बँक खात्यात/धनादेशाद्वारे जमा करण्यात येईल. तसेच त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल.
    3. मागील तीन वर्षामध्ये पुरस्कार प्राप्त झालेल्या अंगणवाडी सेविका / मदतनीस / मुख्यसेविका (पर्यवेक्षिका)  आशा वर्कर यांची पुन:श्च निवड केली जाणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. सदर कार्यक्रम जिल्हास्तरावरचा असल्याने तो मुख्यालयात किंवा जिल्हयातील अन्य ठिकाणी देखील आयोजित करण्यात येईल. तसेच कार्यक्रमामधील सर्व उपस्थितांना अल्पोपहार, भोजन व चहापाणी देण्यात येईल.

    आवश्यक कागदपत्राच्या प्रती

    विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयाचे जा.क्र.ठाजिप/मबाकवि/योजना/294 /2024

    दिनांक 16/05/2024 च्या पत्रासोबत दिलेले आहेत.

                      प्रकल्पस्तरावरून प्राप्त प्रस्ताव खातरजमा न करता अथवा विहित पध्दतीने छाननी न करताच प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केले जातात ही बाब योग्य नाही. त्यामुळे कार्यालयाचा नाहक वेळ जातो, तरी अर्जांची छाननी करूनच परिपुर्ण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर करावेत. सन 2024-2025 या या आर्थिक वर्षामधील वैयक्तीक लाभाच्या योजनांचे विहित नमुन्यातील अर्ज आपल्या कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. तरी विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन वैयक्तीक लाभांचे योजनांचे परिपुर्ण प्रस्ताव वर नमुद केल्याप्रमाणे Soft व Hard Copy  सादर करावेत.

     

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र.

संकलन सहाय्यकाचे नाव व पदनाम

कार्यालयाकडून अभिलेख कक्षाकडे पाठविलेले अभिलेख

अभिलेख कक्षातील अद्यावत करून ठेवलेले अभिलेखे

अभिलेख कक्षामध्ये अद्यावतीकरणांनंतर जतन करून ठेवलेले अभिलेख

 

 

क1

एकूण

क1

एकूण

क1

एकूण

 

निरंक

निरंक

निरंक

 

नागरीकांची सनद अनुसूची

नागरिकांची सनद २०२४ PDF

 

 

 

अंदाजपत्रक

अंदाजपत्रक 2024-25
 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

( नियम 38 )

दि.07 ऑक्टोंबर 2022 रोजी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेचे संक्षिप्त इतिवृत्त 

 इतिवृत्त भाग-1

दिनांक

उपस्थित  असलेल्या सभासदांची  नावे

उपस्थित अधिकारी /कर्मचारी

07 ऑक्टोबर  2022

सकाळी 11.30 वाजता

श्रीम.पुष्पा गणेश पाटील, - सभापती तथा अध्यक्ष, जि.प. ठाणे

1)श्री.संजय बागुल,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास

श्रीम. जयश्री सासे – सदस्य

2) श्रीम. सतीश पोळ, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प  शहापुर / डोळखांब

श्रीम. दर्शना ठाकरे  - सदस्य

3)श्रीम. व्हि. व्हि. दाभाडे  बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प भिवंडी -1 व भिवंडी -2

श्रीम. सपना भोईर  – सदस्य

4) श्रीम. अर्चना पवार , बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प कल्याण / अंबरनाथ

श्रीम. सगिना शेख – सदस्य

5) श्रीम.धनश्री साळुंखे बाल विकास प्रकल्प ठाणे ग्रामीण

श्रीम. सुषमा लोणे – सदस्य

6) श्रीम. ज्योती लंगुटे , बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प मुरबाड -1

श्रीम. दिपाली झुगरे – सदस्य

7) श्रीम. कल्पना देशमुख  बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प मुरबाड -2 

श्रीम.  नंदा उघडा  – सदस्य

8) कार्यालयीन कर्मचारी (सर्व)

श्रीम. यशोदा आवटे – सदस्य

                 

            महिला व बाल कल्याण समितीच्या सभा या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 111 अन्वये आयोजित करण्यात येतात.

           दि. 07 ऑक्टोबर 2022 रोजीची महिला बाल कल्याण  समितीची सभा सकाळी  11.30 वाजता सन्मा. अध्यक्ष यांच्या दालनात घेण्यात आली.  सभेची सुरूवात करण्यापुर्वी सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी मा. सभापती, महिला व बाल कल्याण समिती  तथा अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे व सर्व सन्मानिय सदस्यांचे स्वागत करून, मा. सभापती महोदया यांच्या परवानगीने सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली.

विषय क्र 1 -  मागील सभेच इतिवृत्त वाचून कायम करणे.

           सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग यांनी दि. 14 सप्टेंबर  2022 रोजी झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले व त्यास सभागृहाने सर्वानुमते मान्यता दिली  

ठराव क्र.  218  सर्वानुमते मंजूर

सुचक :- श्रीम.  दिपाली झुगरे  – सदस्या

                                                              अनुमोदक :- श्रीम. यशोदा आवटे  - सदस्या

 

 

 

 

 

विषय क्र.2 :- मागील सेभेच्या इतिवृत्तावरील कार्यवाही अहवालास मान्यता देणेबाबत.

 

दिनाक 14 सप्टेबर 2022 रोजी झालेल्या सभेमधील ठरावांवर खालीलप्रमाणे करण्यात आली.

 

.क्र.

ठरावाचा मजकूर

कार्यवाही

1.

 दि. 14 सप्टेबर 2022 रोजी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेच्या इतिवृत्तास मान्यता देणे.

महिला व बाल कल्याण समितीने सर्वानुमते  इतिवृत्तास मान्यता दिली आहे.

2.

दि. 14 सप्टेबर  2022  रोजी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेच्या कार्यवाही अहवालास मान्यता देणे.

महिला व बाल कल्याण समितीने सर्वानुमते इतिवृत्तावरील कार्यवाही अहवालास मान्यता दिली आहे.

3

महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत घरघंटी /शिलाई मशिन व पिको फॉल मशिन तसेच शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे  जि. . योजना सन 2022 – 2023

इतिवृत्तामधील भाग-1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत घरघंटी / शिलाई मशिन / पिको फॉल मशिन या साहित्याचे अर्ज तसेच शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल   पुरविणे या योजनेचे अर्ज मागील आर्थिक वर्षातील व चालु आर्थिक वर्षातील प्रकल्प स्तरावरून अर्ज प्राप्त झालेले असुन, सदर लाभार्थ्यांचे अर्जाची छाननी करण्यात आली. व  पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत सभागृहात चर्चा झाली. सन 2022 -2023 या मधील योजनेच्या प्रारूप मधील अटी व शर्तीनुसार सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

4

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा आस्थापना व योजना विषयक बाबीचा वार्षिक प्रशासन अहवालास मान्यता देणेबाबत

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा आस्थापना व योजना विषयक बाबीचा वार्षिक प्रशासन अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे कामी महिला व बाल कल्याण समितीची मान्यता आवश्यक असल्याने आजच्या विषय समिती समोर मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे. तरी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा आस्थापना व योजना विषयक बाबीचा वार्षिक प्रशासन अहवालावर  सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्वानुमते मान्यता देण्यात आली

 

 ठरावावरील कार्यवाहीचे सभागृहात वाचन करण्यात आले व त्यास सभागृहात सर्वानुमते मान्यता दिली.     

ठराव क्र. 219:- सर्वानुमते मंजूर

                                                                  सूचक : श्रीम. सपना भोईर   – सदस्य

                                                                 अनुमोदक : श्रीम. सुषमा लोणे – सदस्य

 

विषय क्र. 3 :- शासकीय परिपत्रकांचे वाचन करणे

 

  •           शासन परिपत्रक नसल्याने , कार्यवाही नाही

 

विषय क्र. 4 :- महिला व बाल कल्याण  समितीमधील सन्मा सदस्यांचे रजेचे अर्ज.                    

                     

                        आजच्या सभेसाठी सन्मा. सदस्य यांचे रजेचे अर्ज नाहीत .

 

 विषय क्रं.5 :- महिला व बाल कल्याण समिती सभेसमोर ठेवावयाचे विषय –

  1. महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत घरघंटी / पिको फॉल मशिन /शिलाई मशिन  तसेच शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे जि. प. योजना सन 2022-2023 मधिल प्रकल्पस्तरावरून प्राप्त झालेल्या अर्जाना मान्यता देणेबाबत.

   अ) भिवंडी - 2 प्रकल्पातील महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत घरघंटी या साहित्यांचे अर्ज प्रकल्पस्तरावरून 5 प्राप्त झालेले असून सदर लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली असता सर्व पात्र आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

लाभार्थ्यांचे नाव

1

भिवंडी -2

श्रीम. सानिका सागर भोईर

2

श्रीम. सुजाता संतोष लाटे

3

श्रीम. संजना संयज भोईर

4

श्रीम. उज्वला पंडीत तेलीवरे

5

श्रीम. राधाबाई बाळाराम शिकारी

 

) कल्याण  प्रकल्पातील महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत घरघंटी या साहित्यांचे अर्ज प्रकल्पस्तरावरून  20 प्राप्त झालेले असून सदर लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली असता 10 पात्र आहेत (घरघंटी -9 व शिलाई मशिन 1)  त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

लाभार्थ्यांचे नाव

1

कल्याण

श्रीम. मनिषा बाळाराम कडव

2

श्रीम. जना रमेश दिवाणे

3

श्रीम. अंजनाबाई गंगाराम भोईर

4

श्रीम. संगीता बाळाराम भोईर

5

श्रीम. रेखा बंडू पाठारे

6

श्रीम. कल्पना संतोष पानसरे

7

श्रीम. श्रध्दा महेश वाघेरे

8

श्रीम. सुनिता गौरू चौधरी

9

श्रीम. लक्ष्मी मंगल दिवाणे

10

श्रीम. पदमा गणेश झुगरे

 

 

 

 

 

इ) डोळखांब  प्रकल्पातील महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत घरघंटी या साहित्यांचे अर्ज प्रकल्पस्तरावरून 14  प्राप्त झालेले असून सदर लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली असता 13 पात्र आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

लाभार्थ्यांचे नाव

1

डोळखांब

श्रीम. रेणुका रमेश शेलवले

2

श्रीम. सुवर्णा सुनिल फर्डे

3

श्रीम. श्रीम. आशा चंद्रकांत घनघाव

4

श्रीम. मनिषा ज्ञानेश्वर कुलकर्णी

5

श्रीम. गीता गणपत आरज

6

श्रीम. सुवर्णा भास्कर गोडे

7

श्रीम. अर्चना अर्जुन वागे

8

श्रीम. वंदना भरत वागे

9

श्रीम. अंजना बाळकृष्ण शिंदे

10

श्रीम. भारती संभाजी चौधरी

11

श्रीम. रेश्मा प्रमोद चौधरी

12

श्रीम. भारती संदीप पडवळ

13

श्रीम. आशा जनार्दन हरणे

 

ई) कल्याण  प्रकल्पातील शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे या साहित्यांचे अर्ज प्रकल्पस्तरावरून 10  प्राप्त झालेले असून सदर लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली असता 9 पात्र आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

लाभार्थ्यांचे नाव

1

कल्याण

कु. प्राची सुभाष देसले

2

कु. रश्मी भास्कर दिवाणे

3

कु. मानसी ज्ञानेश्वर दिवाणे

4

कु. पल्लवी संदीप दिवाणे

5

कु. प्रिया तुकाराम दिवाणे

6

कु. धनश्री रमेश दिवाणे

7

कु. सायली बाळाराम दिवाणे

8

कु. दिया बाळाराम जाधव

9

कु. कविशा योगेश दिवाणे

 

                  सदर लाभार्थ्यांस लाभ  सन 2022 2023 च्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पातील उपलब्ध असलेल्या तरतुदीमधुन मंजुर करणेबाबत सभागृहात चर्चा झाली व योजना प्रारूप मधील अटी व शर्तीनुसार सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

ठराव क्र. 220:- सर्वानुमते मंजूर

                                                                  सूचक : श्रीम. जयश्री सासे   – सदस्य

                                                              अनुमोदक : श्रीम. यशोदा आवटे – सदस्य

 

 

 

                        

 विषय क्र. 6 - मा. सभापती यांच्या मान्यतेने घ्यावयाचे विषय

 

  1. सन्मा. सदस्य श्रीम. यशोदा आवटे  यांनी  अशी विचारणा केली की, नवीन अंगणवाडी बांधकामाकरीता निधी कधी उपलब्ध होणार आहे यावर  सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी असे सांगितले की, नवीन अंगणवाडी बांधकामाकरीता जिल्हा नियोजन समितीकडे निधी उपलब्धतेबाबत पाठपुरावा सुरू आहे निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल असे सांगीतले.
  2. सन्मा. सदस्य श्रीम. दिपाली झुगरे यांनी स्मार्ट अंगणवाडीबाबत विचारणा केली असता, सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी असे सांगितले की, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच  पालकमंत्रयांनी मान्यता दिल्यानंतर निधी मिळेल असे ही सांगण्यात आले.

 

  1. सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी यांना खालीलप्रमाणे दिलेल्या सर्व साधारण सुचना
  1. सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या प्रकल्पात भरविण्यात येणारे मेळावे जि.प./ पं.स/ग्रा.प. सन्मा. सभापती / सदस्य यांचेकडून वेळ व तारीख घेऊन मेळावे भरवावेत. तसेच मेळावे भरविण्याच्या तारखा सन्मा. सभापती / सदस्य यांना कळवाव्यात.
  2. सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी  सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्रकल्पाची पुरस्काराबाबतची विहित नमुन्यातील माहिती आठ दिवसात सादर करण्याबाबत सांगीतले. तसेच पुरस्काराची माहिती देताना मागील  दोन तीन वर्षापुर्वी  ज्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला असेल, अशा कर्मचा-यांची नावे चालु वर्षाच्या माहितीत दिली जाणार नाहीत याची शहानिशा करून माहिती सादर करणेबाबत सुचना दिल्यात. 
  3. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी  आपल्या स्तरावर प्राप्त होणारे वैयक्तीक लाभाचे अर्ज आठ दिवसात सादर करावेत.
  4. सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचे सत्कार करणे या योजनेचे अर्ज आठ दिवसात सादर करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
  5.   सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना लाभार्थ्यांना लाभ देतानाआधारकार्ड नंबरची पडताळणीचे काम सूरू करण्याबाबत सांगितले.

 

              आजची विषय समिती सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वाचे आभार मानून मा. सभापती  तथा अध्यक्ष जि. प. ठाणे महोदया यांच्या परवानगीने सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

 

 

          सचिव तथा                                             सभापती

  जिल्हा कार्यक्रम अधिकारी                              तथा अध्यक्ष जि. प. ठाणे

     महिला व बाल विकास                             महिला व बाल कल्याण समिती                                            

       जिल्हा परिषद ठाणे                                     जिल्हा परिषद ठाण

 

 

 

 

 

अर्ज नमुने

  1. अपंग सर्वसाधारण महिलांना घरघंटी पिठाची चक्की (म.बा.क.)

  2. आदर्श अंगणवाडी निवडी करीता मुल्यमापन तक्ता (म.बा.क.)

  3. जुडो कराटे व योगाचे प्रशिक्षण सन 2018-19 (म.बा.क.)

  4. टंकलेखन प्रशिक्षण (अर्जाचा नमुना) (म.बा.क.)

  5. मुलीना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे (म.बा.क.)

  6. राज्यस्तरीय विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे योजना सन 2018-19 (म.बा.क.)

  7. शाळेत जाणा-या मुलींना (इयत्ता  7 वी ते 12 वी पर्यत शिकणा-या )सायकली पुरविणे (म.बा.क.)

  8. संगणक (MS-CIT) प्रशिक्षण (म.बा.क.)

  9. शिवण मशिन मशिन खरेदी केल्यानंतर प्रतिपूर्ती मिळण्याबाबतचा अर्ज सन 2018-19

  10. पिको फॉल  मशिन खरेदी केल्या नंतर प्रतिपूर्ती मिळण्याबाबतचा अर्ज सन 2018-19 

  11. सौर कंदील/ तांदूळ मशीन /मिनी सॉ मिल/तेल उत्पादक मशिन /मिनी फलोअर मिल,

    शेवया मशीन / पापड मशीन,/ मसाला मेकर 2018-19

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

महिला व बालकल्याण विभाग

प्लॉट A 106 / 107  रोड नं 21 अपोझिट सेंट्रल एक्साईज ऑफिस                            पिन कोड 400604 जिल्हा परिषद ठाणे

                                                      दुरध्वनी क्रमांक – 022 -25369122,

ईमेल आयडी :-cwdzp169thane@gmail.com

अ.क्र.

कार्यालय

पदनाम

दुरध्वनी क्रमांक

मोबाईल क्रमांक

1

2

5

6

7

1

महिला व बालकल्याण विभाग, जि.प.ठाणे

महिला व बाल विकास अधिकारी

022-25369122

99677282382

2

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प भिवंडी-1 (ग्रा.)

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

---

8425847772

3

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प भिवंडी-2 (ग्रा.)

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

---

8425847772

4

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प शहापूर

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

02527-273787

8888497710

5

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प डोळखांब

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

02527-234307

8104264966

6

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प मुरबाड-1

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

02524-223632

8530685021

7

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प मुरबाड-2

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

---

8530685021

8

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प कल्याण

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

0251-2311400

9975378991

9

ए.बा.वि.से.यो.प्रकल्प अंबरनाथ

बाल विकास प्रकपल्प अधिकारी

0251-2680863

9975378991

 

 

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

वर्ग-3

अ.

क्र.

कर्मचाऱ्यांचे नांव

कोणत्या जि.प. कडून येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का?

शेरा

1

2

3

4

5

6

 

निरंक

 

वर्ग-4

अ.

क्र.

कर्मचाऱ्यांचे नांव

कोणत्या जि.प. कडून येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का?

शेरा

1

2

3

4

5

6

 

निरंक

 

यशोगाथा

छायाचित्र दालन