जिल्हयातील सर्व 932 ग्रामपंचायतींना संगणक, प्रिंटर व नेट कनेक्शन व वेब कॅमेराचा पुरवठा करुन उपलब्ध करुन दिलेले आहे. सर्व 932 ग्रा.पं. यांना डाटा एन्टट्री ऑपरेटर, TC व जिल्हास्तरावर DC उपलब्ध करुन दिलेले आहेत. प्रिया सॉप्टमध्ये सर्व खर्चांच्या नोंदी अपडेट आहेत (मार्च 2013 पर्यंत), ग्राम सुविधा केंद्राच्या माध्यमातून गांव पातळीवर आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु झालेला आहे. गावपातळीवरील सार्वजकिन मालमत्तेच्या सर्व नोंदी ऑनलाईन करणे सुरु आहे.
पुढील टप्प्यात येत्या वर्षभरामध्ये ग्रा.पं. 127 नमूने आनलाईन अपडेट करण्याचा मानस आहे.
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना - आंतापर्यंत सर्वांत चांगली योजना- प्रत्येक ग्रामपंचायती रु.6.00 लक्ष ते 30.00 लाख अनुदान (लोकसंख्ये नुसार 3 वर्षात) या योजनेत आंतापर्यंत गेल्या तीन वर्षात 80.00 लक्ष वृक्षलागवड पैकी 57.00 लक्ष (72%) वृक्ष जीवंत आहेत. एकूण 932 ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षासाठी 610 द्वितीय वर्षासाठी 187 व तृतीय वर्षासाठी 51 ग्रामपंचायती पात्र झालेल्या आहेत. ECO villege, जनसुविधा, 13 वा वित्त आयोग, अंगणवाडी बांधकामासाठी गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतीनर 2.00 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यामधून ग्रामपंचायत कार्य्यालय, स्मशानभूमी, रस्ते, नाली बांधकाम, समाजमंदिरे, वृक्षलागवड, पाणी पुरवठयाची साधने, इत्यादी मुलभूत स्वरुपाची कामे झालेली आहेत.